नाशिक : लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.  मी मराठा ही जात मानत नाही. मराठा हा जर जातीवाचक वाटत असेल, तर तुम्हाला राष्ट्रगीतातून हा शब्द काढावा लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून जो शब्द दिला, तो कायम राहणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं. मराठा हे मुलखाचे नाव आहे, हे शासनाने समजून घ्यावे. जास्तीत जास्त हा आठ जिल्ह्यातील प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्रातील हा प्रश्न नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) भाष्य केलं आहे. 


आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. मागील अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनाला बच्चू कडू यांनी समर्थन दिलं आहे. तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मी जो शब्द दिला तो कायम असणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली. 


लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला - बच्चू कडू


उपोषणावर लाठीचार्ज झालेला तुम्ही कधी बघितला का ? जर तिथे लाठीचार्ज झाला नसता, तर तुम्ही जरांगे यांचे नाव घेऊन आले असते का ? फडणवीसांनी त्यांची भूमिका बदलायला नको होती. उपोषण दोन दिवस अधिक चालले असते, तर वाईट काही झाले नसते. लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 


ही राजकीय बियाणे पेरण्याची वेळ - बच्चू कडू


हे सगळं पक्ष संघटना वाढवण्याच्या हिशोबाने उतरले आहेत. जरांगे हे नेते असते, तर त्यांना म्हटलो असतो. पण ते कार्यकर्ता आहे. यामध्ये मी असू शकतो, भुजबळ, फडणवीस, शिंदे असू शकतात.पाणी पडल्यावरच आपण बियाणे पेरतो ना. ही राजकीय बियाणे पेरण्याची वेळ आहे.सरकार म्हणत आहे, ओबीसी धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, मग सभा का घेतल्या जात आहे ? असा सवाल उपस्थित करत बच्चू कडू यांनी भुजबळांवर निशाणा साधला. ही राजकीय पेरणी करण्याची वेळ आहे, ती पेरणी होत आहे. यातून नेत्याला भरपूर भेटल्याशिवाय राहणार नाही. समाजासमाजात तेढ होऊ नये, याची काळजी सर्व नेत्यांनी घ्यावी, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


मोठी बातमी! मराठा आंदोलनाची घोषणा मनोज जरांगेंनी पुढे ढकलली, आता 'या' तारखेला होणार घोषणा