Nashik News : स्थानिक महिला बचत गटांमार्फत सध्या पोषण आहार दिला जातो. सेंट्रल किचन योजनेतील अडीच ते तीन वर्षांपूर्वीचा जवळपास 14 हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आलाय, शालेय पोषण आहार योजने अंतर्गत 13 ठेकेदाराना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते, त्यातील एका ठेकेदाराने हा तांदूळ दडवून ठेवला होता.
तांदूळ शासनाला जमा का करण्यात आला नाही?
केंद्र सरकारचे निर्देश आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून माध्यान्ह भोजन प्रक्रिया राज्यात सुरू करण्यात आली. महापालिका व खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सारख्या चवीचे, ताजे, पोषक व सकस आहार मिळावा यासाठी सेंट्रल किचन पद्धतीने शालेय पोषण आहारांतर्गत माध्यान्ह भोजन पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निकृष्ट दर्जाचा तांदूळ महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आला,
महिलांकडून कारनामा उघड
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यानच महिलांकडून ठेकेदाराचा कारनामा उघड करण्यात आला, पोषण आहार बंद असताना तांदूळ शासनाला जमा का करण्यात आला नाही, अडीच तीन वर्षे दडवून का ठेवण्यात आला? या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, यंसदर्भातील अहवाल मनपा आयुक्तांना शिक्षण विभाग पाठवणार असून पुढील कारवाई केली जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis : युक्रेनवरील हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियावर लादले नवे निर्बंध, रशियन बँका लंडनच्या आर्थिक व्यवस्थेबाहेर
- Russia Ukraine War : रशियन फौजांचा चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा; जगाच्या चिंतेत भर
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha