Nandurbar: 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल. मात्र बऱ्याचदा या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्याला प्रत्यक्षात पाहायलाही मिळतात. अशीच एक घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार (Nandurbar) येथील नवापूर शहरालगत तीनटेंभा रेल्वे गेटवर घडली आहे.
रेल्वेचे फाटक (Railway Gate) बंद करत असताना आयसर ट्रक रेल्वे रुळावरून मार्गस्थ होत होती. रेल्वे रुळावरील (Railway Track) एक ट्रॅक क्रॉस केला. दुसऱ्या ट्रॅकवर ट्रक बंद पडला, त्याच ट्रॅकवरून रेल्वे पॅसेंजर (Railway passenger train) सुरतकडून भुसावलकडे मार्गस्थ होणार होती. यादरम्यान ट्रकला हलवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.
नवापूर शहरातून गुजरात राज्यात जात असलेल्या आयसर ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. आयसर ट्रक रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर आला आणि तिथेच बंद पडलेल्या ट्रकला चालकाने सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ट्रक सुरू झाला नाही. एकीकडे रुळावर अडकलेली ट्रक तर दुसरीकडे रेल्वे पॅसेंजर गाडी (Railway passenger train) येण्याची झालेली वेळ यामुळे चालक, नागरिक रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
सर्वांनी मिळून ट्रक रुळावरून (Railway Track) हलवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या बाजूला चढाव असल्याने ट्रक इंचभर देखील जागेवरून सरकत नव्हता. नवापूर शहरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन ट्रकच्या पुढच्या बाजूने धक्का मारून रुळावरून बाजूला केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच रेल्वे पॅसेंजर रुळावरून गेली. पाच मिनिटांचा ही विलंब झाला असता तर पॅसेंजर रेल्वेने ट्रकला (Railway Track) धडक देऊन रेल्वेचा भीषण अपघात झाला असता. यात मोठी जीवित व वित्त हानी झाली असती. परंतु सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेने कुठलीही दुर्घटना झाली नाही. या घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: