नंदुरबार: शिकाल तर टिकाल असं म्हटलं जात असतं मात्र शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य कसे असेल हे विचार न केलेले बरे... अशीच गत तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील (International School in Nandurbar) विद्यार्थ्यांची झाली आहे. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत एकही पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा मोठ शैक्षणिक नुकसान होत आहे.
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील 18 शाळांचे समायोजन करून आणि सातशे साठ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने 2018 साली शाळा सुरू केली. मात्र आता या आंतरराष्ट्रीय शाळेत विज्ञान आणि गणिताचे शिक्षक नाहीत. त्याच्यासोबत सहावी ते दहावीच्या वर्गांना शिकवणारे पदवीधर शिक्षकांच्या 18 पैकी 18 जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पहिली ते दहावीपर्यंत असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आलिशान इमारती उभारण्यात आल्या आहेत. शैक्षणिक सुविधांसाठी अत्याधुनिक वर्गखोल्या असल्या तरी शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शाळेतील 26 शिक्षकांची पद भरली असली तरी माध्यमिकची 18 पैकी 18 पदे रिक्त आहेत. परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेत 1600 विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय करण्यात आली आहे . सुविधा चांगल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळेतील स्थिती..
- एकूण विद्यार्थी 1534
- विद्यार्थी 854
- विद्यार्थिनी 683
- प्राथमिक शिक्षक मंजूर पदे 26 भरलेली पदे 26
- माध्यमिक शिक्षक मंजूर पदे 18 रिक्त पदे 18
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुधीर पाटील म्हणाले, आमच्या शाळेत एकूण 1537 विद्यार्थी आहे. माध्यमिक वर्गासाठी आम्हाला 18 शिक्षकांची गरज आहे. सध्या एकही शिक्षक नाही. त्यामुळे माध्यमिकच्या वर्गांना शिकवताना ताण पडतो. विज्ञान आणि गणितासाठी शिक्षकांची आम्हाला गरज आहे. नावाला आंतरराष्ट्रीय असलेले शिक्षण आमच्या काय कामाचे असा प्रश्न आता या भागातील पालक आणि विद्यार्थी विचारत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
गोंदिया जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा भरते बकरीच्या गोठ्यात, पहिले ते तिसरीचे वर्ग भरतात एकाच छताखाली
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI