नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदे गावातील आदिवासी बांधवांना अंतिम संस्कार (Funeral) करण्यासाठी नदीनाल्यातून 4 ते 5 फूट खोल पाण्यातून अंत्यविधी करण्यासाठी जावे लागते. देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली तरी आदिवासींची (Tribal) हेळसांड मात्र थांबता थांबत नाही हे आदिवासीचे दुर्दैव म्हणावे लागेल. वागदे गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत (Cemetery) जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी नाल्यातून मार्गस्थ व्हावे लागते. स्मशानभूमीत जाण्यासाठी नाल्यावर छोट्याशा पुलाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. परंतु संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आदिवासींनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी विकास मंत्री यांच्या जिल्ह्यात हा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भर पावसाच्या नदीला पूर असताना देखील ग्रामस्थांना 3-4 फूट पाण्यात दोर बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमी गाठावी लागते. मरणानंतर देखील आदिवासींच्या मरणयातना सुरुच आहेत. 


नंदुरबार जिल्ह्यात एकूण 638 ग्रामपंचायत आहेत त्यापैकी 198 ग्रामपंचायतीत स्मशानभूमी आहेत. 440 ग्रामपंचायतीत स्मशानभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे. राहिलेल्या ग्रामपंचायत स्मशानभूमी तयार करण्याच्या प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सूत्राने दिली.


नंदुरबार जिल्ह्यातील तालुका निहाय ग्रामपंचायत आणि स्मशानभूमी आकडेवारी


1) शहादा तालुक्यात 151 ग्रामपंचायती आहेत. 35 ग्रामपंचायतीत स्मशान भूमी आहेत तर 116 ग्रामपंचायतीत स्मशानभूमी नाही. 


2) तळोदा तालुक्यात ग्रामपंचायत 67 ग्रामपंचायती आहेत. 28 ग्रामपंचायती स्मशान भूमी आहेत तर 39 ग्रामपंचायती स्मशानभूमी नाही


3) नवापूर तालुक्यात ग्रामपंचायत 116 ग्रामपंचायती आहेत. 21 ग्रामपंचायती स्मशानभूमी आहेत तर 95 ग्रामपंचायती स्मशानभूमी नाही


4) अक्कलकुवा तालुक्यात ग्रामपंचायत 79 ग्रामपंचायती आहेत. 21 ग्रामपंचायती स्मशानभूमी आहेत तर 58 ग्रामपंचायती स्मशानभूमी नाही.


5) धडगाव तालुक्यात ग्रामपंचायत 88 ग्रामपंचायती आहेत. 52 ग्रामपंचायती स्मशानभूमी आहेत तर 36 ग्रामपंचायती स्मशानभूमी नाही.


6) नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत 138 ग्रामपंचायती आहेत. 41 ग्रामपंचायती स्मशानभूमी आहेत तर 97 ग्रामपंचायती स्मशानभूमी नाही.


हेही वाचा


Nashik news : मरणयातना संपतच नाहीत! सुरगाण्यात स्मशानभूमी अभावी दोघांवर भर पावसात अंत्यसंस्कार