नंदुरबार: नंदुरबारच्या (Nandurbar News)  शहादा तालुक्यातील घोड्यांना ग्लॅन्डर्स (Horses Glanders disease)  हा साथीचा रोग झाल्याचं समोर आले आहे.  ग्लॉडर्स रोग जीवघेणा असून त्याचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.  त्यामुळे शहादा शहरापासून पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नऊ घोडे आणि सात गाढव यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच प्रादुर्भावग्रस्त घोड्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. हा रोग एवढा घातक आहे की घोड्याला याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर घोड्याला दया मरण दिले जाते.


ग्लॅन्डर्स हा संसर्गजन्य आजार असल्याने घोड्याच्या तबेल्यापासून पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पाच किलोमीटरच्या परिसरात घोड्यांचे वाहतूक घोड्यांचे खरेदी विक्री किंवा घोड्यांचे इतर कोणत्याही कार्यक्रम करता येणार नाही. त्याच्यासोबत परिसरातील घोडे, खेचर आणि गाढव यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 


ग्लॅन्डर्स आजाराची लक्षणे (Glanders Disease Symptoms)



  • घोड्याच्या अंगावर गाठी येतात गाठी फुटून  जखम होतात

  • घोड्याला ताप येऊन तो अन्न पाणी काहीही घेत नाही तसेच अशक्तपणामुळे त्याला इतर त्रास होतात.

  • नमुने पॉझिटिव्ह आल्यावर दया मरण दिले जात असते.

  • जिल्ह्यात प्रथमच ग्लॅडर्स चा प्रादुर्भाव झाला आहे.

  • संसर्गजन्य असल्याने घोड्यांना विलगीकरणात ठेवतात.

  •  या अगोदर काही वर्षापूर्वी राज्यात महाबळेश्वर आणि नाशिक या ठिकाणी ग्लॅडर्सचा प्रादुर्भाव आढळून आला होता.


सध्या पहिल्या टप्प्यात पाच किलोमिटरच्या परिसरात असणाऱ्या प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 25 किलोमिटरच्या परिसरात असणाऱ्या अश्ववर्णीय प्राण्यांचे नमुने घेण्यात येणार आहे.  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पुरेसा लससाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजन करण्यात आल्या आहेत. महिन्याभरापूर्वी सुरतमध्ये देखील घोड्यांना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. या संदर्भातील कोणत्याही माहितीसाठी पशुसंवर्धन विभागासाठी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :


उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाची चतुःसूत्री, 'अशा' प्रकारे करा उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन मगच मिळेल अधिकचे उत्पन्न