Nandurbar: तळोदा-शहादा मार्गावर असलेल्या चांदशैली घाटातील (Chandsaili Ghat) वाहतूक महिनाभरासाठी बंद करण्यात आली आहे. दरड प्रतिबंधक उपाययोजनांचं काम करण्यासाठी साधारण महिनाभर नंदुरबारमधील (Nandurbar) हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिले आहेत. यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक शहाद्याकडून वळवली जाणार आहे.


घाट रस्त्यावर दगड-माती कोसळण्याची शक्यता


सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा-धडगाव रस्त्याची ओळख आहे. मात्र या रस्त्यात असलेल्या चांदशैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दगडं आणि माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे चांदशैली घाट रस्ता महिनाभर बंद राहणार आहे.


अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी


तळोदा-शहादा मार्गावर या मार्गावरील धोकादायक ठिकाणी गॅबियन संरक्षण भिंत उभारण्यासाठी मार्गावरील वाहतूक 28 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार असून यातून अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळण्यात आली आहेत, या संदर्भातला आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिला असून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात आली आहे.


दमदार पाऊस झाल्याने नंदुरबारमध्ये पेरण्यांना वेग


राज्यातील विविध भागांप्रमाणे नंदुरबारमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे काही भागात शेती कामांना वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दमदार असा पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. 


जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 लाख 88 हजार 465 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार आहे. त्यापैकी 2 लाख 7 हजार 563 क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कापूस आणि सोयाबीन या पिकाखाली आहे. तर उर्वरित क्षेत्रात कमी कालावधी देणाऱ्या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं आहे. यावर्षी जिल्ह्यात मान्सून महिनाभर उशिरा दाखल झाल्याने पेरण्यांना देखील उशीर झाला आहे. अशी परिस्थिती असली तरी शहादा आणि धडगाव तालुक्यातील काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने या भागातील पेरण्या रखडल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kolhapur Rain Update: कोल्हापूर घाट क्षेत्रातून कोकण, गोव्यासाठी प्रवास करत आहात? मग अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी