Agriculture News : राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. या पावसामुळं अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. चांगला पाऊस झाल्यामुळं काही भागात शेती कामांना वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दमदार असा पाऊस झाल्यानं पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सर्वाधिक क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. 


दोन लाख 7 हजार 563 क्षेत्रावर पेरण्या पूर्ण 


नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक भागात दमदार असा पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन लाख 88 हजार 465 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार आहे. त्यापैकी दोन लाख 7 हजार 563 क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कापूस आणि सोयाबीन या पिकाखाली आहे. तर उर्वरित क्षेत्रात कमी कालावधी देणाऱ्या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. यावर्षी जिल्ह्यात मान्सून महिनाभर उशिरा दाखल झाल्यानं पेरण्यांना देखील उशीर झाला आहे. अशी परिस्थिती असली तरी शहादा आणि धडगाव तालुक्यातील काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्यानं या भागातील पेरण्या रखडल्या आहेत. तर काही ठिकाणी अल्पशा पावसावर पेरण्या झाल्यानं त्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याचेही चित्र आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण पावसाची परिस्थिती पाहिली असता उर्वरित भागात दमदार असा पाऊस झालाय. तर शहादा तालुका आणि काही भागात अजूनही दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.


खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र हे 142 लाख हेक्टर आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil chavan) यांनी केलं आहे. दरम्यान, चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : राज्यात खते आणि बियाणांचा मुबलक साठा, पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी : कृषी आयुक्त