नंदुरबार :  आज भारतात (India) असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे, पण ते शेती करत आहेत. गलेलठ्ठ नोकरी करण्याऐवजी हे तरुण शेती करुन ग्रामीण अर्थव्यवस्था (Rural Economy) वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. . आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत.  नंदुरबार (Nandurbar News)  जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आसते मात्र आता आदिवासी भागातील तरुणांनी या ठिकाणच्या हवामानाचा आणि परिस्थतीचा अभ्यास करून रोजगाराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. अत्याल्प खर्चात ते मशरूम (Mushroom)  उत्पादन घेऊ लागले आहे.  त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च करवा लागत नसल्याने अनेक परिवारांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले.  विशेष म्हणजे हे करतांना त्यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूपासून बेड तयार केले आहेत.


मशरूम शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते आधुनिक असे शेड ,त्यसाठी लागणारा खर्च मात्र आपला हा समज सातपुड्यातील शिक्षित तरुणांनी दूर केला आहे. योग्य नियोजन केल्यास झोपडीत सुद्धा मशरूम उत्पादन घेता येते रायसिंग वसावे या तरुणाने दाखवून दिले आहे. या शेती साठी विशेष असे कोणत्याही प्रकारचे भांडवलाची गरज नाही. अवघ्या तीन हजार रुपयात त्यांनी मशरूम शेती सुरु केली.आ त्यातून दोन महिन्यात त्यांना उत्पादन सुरु झाले आहे 300 रुपये किलोने मशरूम विक्री होत आहे .


राहत्या घरात 10 बाय 20 च्या जागेत केली बारमाही मशरूम शेती


सातपुड्याचा दुर्गम भागात बाराही महिने रोजगार उपलब्ध करून देण्यासाटी राजेंद्र वसावे हे या भागातील तरुणांना मशरूम प्रशिक्षण देत असतात.  सहज उपलब्ध होणारा शेती पिक निघाल्यानंतर राहिल्या कचऱ्याला निर्जंतुकीकरण् केल्यावर त्या वर प्रक्रिया करून एका पिशवीत भरून बेड तयार केले जात. त्यात मशरूमची लागवड केली जात असते. त्यातून राहत्या घरात 10 बाय 20 च्या जागेत बारमाही मशरूम शेती होत असते.  मशरूम खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे मोठ्या शहरात येथील मशरूम ला मोठी मागणी आहे.


बारमाही रोजगार उपलब्ध


 सातपुड्यात नैसर्गिक साधने आणि या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा वापर करून येथील तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी बारमाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्यासाठी मोठ्या निधीची गरज नाही. 


हे ही वाचा :