Nandurbar News : शहादा कृषी उत्पन्न बाजार (Shahada Bajar Samiti) समितीत पपई उत्पादक शेतकरी (Papaya Farmers) बाजार समिती आणि व्यापारी तसेच शेतकरी संघटना (Farmers Organization) यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पपई दरासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आता पपईला प्रतिकिलो 10 रुपये 25 पैसे दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी व्यापारी पपईला दर देत नसल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकी निष्फळ ठरत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपई उत्पादक शेतकरी बाजार समिती आणि व्यापारी तसेच शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पपई दरासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आता पपईला प्रतिकिलो 10 रुपये 25 पैसे दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई उत्पादन घेतले जाते. मात्र पपईच्या दरासंदर्भात दर वेळेस व्यापाऱ्यांची आडमुठी भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दराच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी पपई तोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नंदुरबार जिल्ह्यात सुरवातीला दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होते. व्यापारी आणि शेतकरी संघर्ष झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून 7.51 पैशांचा दर जाहीर झाला होता. मात्र शेतकरी समाधानी नव्हते त्यांनी 11 रुपये दराची मागणी केली मात्र व्यापारी तयार नव्हते. त्यावेळी झालेल्या  बैठकीत कोणत्याही प्रकारचा समन्वय न झाल्याने पपई तोड करू नये असा निर्णय घेतला होता. आज अखेर 10 रुपये 25 पैशाचा दर निश्चित करण्यात आला आहे. आता तोड सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. 


शेतकऱ्यांत खडाजंगी झाली... 
शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात बैठक होऊन पपईच्या भावासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत सुरुवातीला व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अभिजीत पाटील बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी मध्यस्थी करत पपईला दहा रुपये 25 पैसे प्रति किलोचा दर निश्चित केला आहे. व्यापाऱ्यांनी पपईचे दर परस्पर कमी करू नये काही अडचणी आल्यात तर पपई उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन त्यातून समन्वयाचा मार्ग काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातून दररोज 200 पेक्षा अधिक ट्रकांमधून पपई वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असते. यातून मजूर आणि शेतकऱ्यांनाही रोजगार मिळत असतो. झालेल्या बैठकीत समन्वयाने तोडगा निघाल्याने आजपासून जिल्ह्यातील पपई तोड सुरू होणार आहे.