Nandurbar News : आदिवासी एकता परिषदेच्या (Aadivasi Ekta Parishad) वतीने दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन (Aadivasi Sanrkutik Sammelan) होत असते. यावर्षी 30 वें महासंमेलन गुजरात (Gujrat) राज्यातील कवट येथे संपन्न होत आहे. देशातील विविध भागातील आदिवासी जमातीतील विविध समुदायाचे लोक या संमेलनात सहभागी झाले असून देशभरातील आदिवासी सांस्कृतिक आणि वैचारिक मंथन या ठिकाणी होत आहे.
आदिवासी संस्कृतीची माहिती (Aadivasi Ekta Parishad) आणि आदिवासींवर होणाऱ्या विविध अन्याय अत्याचार यावर चर्चा करण्यासाठी तसेच वैचारिक मंथन करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने 30 व्या महा संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून देशभरातील हजारो आदिवासी प्रतिनिधी सामाजिक राजकीय नेते या संमेलनासाठी दाखल झाले आहेत. आदिवासी सांस्कृतिक संमेलनात (Aadivasi Ekta Parishad) निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच आदिवासी जनसमुदायाच्या अस्तित्वासाठी न्याय हक्कासाठी व विविध विषयांवर चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे या महा संमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपरिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या संमेलनात देशातील विविध भागातून एक लाखांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले असून संमेलनात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संमेलनात सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी या संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या परंपरांची माहिती झाली असून त्याच्यासोबत वैचारिक देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात झाली. तसेच विदेशातूनही आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक या महासंमेलनासाठी (Mahasammelan) आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनासाठी देशभरातील विविध आदिवासी संघटना सहभागी झाले होते. वैचारिक देवाणघेवाण आणि सामाजिक मंथनासाठी होणारे हे महासंमेलन नवीन पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती होण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.
वैचारिक आणि सांस्कृतिक देवाण घेवाण
आदिवासी संस्कृतीची माहिती आणि आदिवासींवर होणाऱ्या विविध अन्याय अत्याचार यावर चर्चा करण्यासाठी तसेच वैचारिक मंथन करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने 30 व्या महा संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या संमेलनात वेगवगेळ्या राज्यातील आदिवासी बांधव एकत्र आले असून या ठिकाणी आदिवासी संस्कृतीची देवाण घेवाण होणार आहे. शिवाय पथकांच्या माध्यमातून आदिवासी विचार, संस्कृती जोपासली जावी यासाठी विविध नृत्ये सादर केली जात आहेत.