नंदुरबार: नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात या खरीप हंगामात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची (Cotton) लागवड करण्यात आली आहे. महिनाभर पावसाने दिलेली उघडीप आणि त्यातच कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. हे कमी की काय गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसाचे येणारे उत्पन्नही हातातून गेले आहे. बीड आणि इतर जिल्ह्यांना कृषिमंत्र्यांनी पीक विम्यातून 25 टक्के अग्रीम रक्कम सरसकट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे अश्रू अनावर
जिल्ह्यात 50 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र लाल्या आणि मर रोगाच्या प्रादुर्भावाखाली आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेला उत्पादन खर्चही निघणार असल्याची स्थिती आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा त्याप्रमाणे थोडाफार जो कापूस येणार होता तो आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खराब झाला आहे. लाल्या आणि मर रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून कापसाच्या शेतीकडे पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर होतात.
सरसकट पंचवीस टक्के अॅडव्हान्स रक्कम पिक विम्यातून द्यावी
नंदुरबार जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस आणि इतर पिकांची वाढ खुंटली आहे. उत्पादन क्षमता कमी झाली आहे सरकारने एक रुपया पिक विमा दिला होता आता त्याच माध्यमातून सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस टक्के अॅडव्हान्स रक्कम पिक विम्यातून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र सरकार पिक विम्याचा संदर्भातही काही जिल्ह्यांना झुकत माप देत असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. आमच्या जिल्ह्यातही लाल्या आणि मग रोगामुळे आणि पाऊस नसल्याने मोठं नुकसान असलं तरी सरकार नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष का करत आहे कृषिमंत्री फक्त एका जिल्ह्याचे नसून राज्याच्या असल्याचा खडे बोलही एका तरुण शेतकऱ्यांनी सुनावला आहे.
कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत
पावसाचा पडलेला मोठा खंड त्यानंतर कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
हे ही वाचा: