Success Story : कुठलेही काम लहान नसते. ते काम यशस्वी करुन दाखवण्याची जिद्द त्या व्यवसायाला यशाचा शिखरावर घेऊन जात असते. याचाच प्रत्यय नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) येथील सुरज फूड इंडस्ट्रीकडे (Suraj Food Industries) पाहिल्यानंतर येतो. 1990 मध्ये सुरू केलेला हा गृह उद्योग आता मोठ्या व्यवसायात रुपांतरित झाला आहे. आज जवळपास 300 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यातून रोजगार प्राप्त होत आहे. पापड उद्योगाच्या माध्यातून आर्थिक समृद्धी आली आहे. पाहुयात पापड उद्योगाची भरारी...
Employment : 300 पेक्षा अधिक महिलांना रोजगार
1990 साली परिसरातील महिलांना रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. यावेळी पारस जैन यांनी सुरज फूड इंडस्ट्री सुरू केली. त्यांनी महिलांना पापड बनवण्यासाठी दिले. ते पापड बाजारपेठेत पारस पापड नावाने विक्रीसाठी मार्केटिंग सुरू केले. बघता बघता जैन यांच्यामुळं 300 पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळू लागला. हे होत असतानाच जैन यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू ठेवला. हा व्यवसाय परिसरातील अनेक परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. हा व्यवसाय अनेक निराधार महिलांचा जीवनाचा आधार झाला असून, पारस पापड आणि इतर वस्तूंचा देशभरातील बाजारपेठेत बोलबाला झाला आहे.
महिलांची दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांची कमाई
शहादासारख्या ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीत. त्यासोबत अनेक कुटुंब पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळं उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र, पारस पापडच्या माध्यमातून शहरातील 300 पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. पापड उद्योगाच्या माध्यमातून दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांची कमाई होत असल्यानं कुटुंबाचा गाडा हाकणे सोपे झाले असल्याच्या प्रतिक्रिया या उद्योगात काम करणाऱ्या महिला देतात. कोणताही व्यवसाय करताना सचोटी शुद्धता आणि प्रामाणिक प्रयत्न राहिले तर त्याचे वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही हे सुरज फूड इंडस्ट्रीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. आपल्या भागांत असलेल्या कच्च्या मालाचा सदुपयोग करत लघुउद्योग आणि गृह उद्योगातूनही मोठे व्यवसायिक होता. येते हे शहरातील जैन परिवाराने सिद्ध केले आहे. 1990 मध्ये पारस जैन यांनी सुरज फूड इंडस्ट्री सुरू केले होते. गृह उद्योग आज 300 पेक्षा अधिक महिलांना रोजगार देत आहे. आज या पापड उद्यगाचे मोठ्या व्यवसायात रुपांतर झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :