Nandurbar Agriculture News : वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम मिरचीच्या पिकावर (Chili  Crop) होत असल्याचं चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of Bhuri disease) झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 


बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत


राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदल्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होत आहे. बदलत्या वातावरमामुळं नंदूरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. कारण ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा परिणाम उत्पादनात घट येत आहे.


मिरचीला चांगला दर मात्र, उत्पादनात घट


मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक भुरी रोगाचाच प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं यावर्षी मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही यातून निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं मिरचीला बाजार भाव चांगला मिळत असला तरी उत्पादन घटल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. यावर्षी मिरची उत्पादन घटल्यानं सर्वसामान्यांच्या जेवणातील चटणीचे दरही वाढणार आहेत. एकूणच मिरचीवर आलेल्या रोगांच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी टाकलेले भांडवल निघण्याची शक्यता नसल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.


राज्यात थंडीचा कडाका वाढला


हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. आजपासून थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळं राज्यात थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच थंडी वाढली आहे. डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10 दिवसात थंडीत चांगलीच वाढ होणार आहे. ही थंडी कदाचित शनिवार (31 डिसेंबर) पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : तापमानाचा पारा घसरला, गारठा वाढला; कसा असेल पुढचा हवामानाचा अंदाज?