Nayagaon Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापैकी आज आपण नायगाव विधानसभा मतदारसंघ (Nayagaon Assembly constituency) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. सध्या या मतदारसंघात भाजपचे राजेश पवार हे आमदार आहेत. 


2019 च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?


नायगाव विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे राजेश पवार 1,17,750 मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाचे चव्हाण वसंतराव बलवंतराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चव्हाण वसंतराव बलवंतराव 71,020 मते मिळवून विजयी झाले होते. भाजपचे राजेश संभाजी पवार यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे 


यावेळी नेमकं काय होणार? 


यावेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. राजकीय समीकरण बदलल्यामुळं तिकीट नेमकं कोणाला द्यावं? असा प्रश्न पक्षांपुढे निर्माण झाला आहे. सध्या भाजपचे राजेश पवार हे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमादर आहेत. मात्र, त्यांच्यावर भाजपचेच कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपमधून त्यांना विरोध वाढत आहे. यामध्ये बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, शिवराज होटाळकर या जुन्या फळीतील नेत्यांना विचारत न घेता राजेश पवार काम करत असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळं राजेश पवार यांना भाजपमधून उघड विरोध होत आहे. तसेच यावेळी काँग्रेसमधून मिनल खतगावकर यादेखील निवडणुकीच्या रिगणात उतरण्याची शक्यता आहे. 


नायगाव मतदारसंघात उद्योग क्षेत्राची कमतरता


नायगाव मतदारसंघात उद्योग क्षेत्राची कमतरता आहे. त्यामुळं रोजगाराच्या संधी कमी आहेत. त्यामुळं या मतदारसंघात उद्योग क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. गोदावरी नदी वाहणाऱ्या या मतदारसंघात गेल्या पाच-सात वर्षात रेती माफियांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. या मतदारसंघात सिंचनाच्या सोयी गेल्या पंधरा वर्षात फारशा वाढल्याच नाहीत. पण गोदावरी नदीकाठावर या मतदारसंघात शेती मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आहे. त्याउलट इतरत्र कायम दुष्काळसदृश्य परीस्थिती आहे. मतदारसंघातील कृष्णुर इथे नावालाच पंचतारांकित औद्योगीक वसाहत आहे. पण या वसाहतीत फारसे उद्योग अद्याप आलेच नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही या तालुक्याची बेरोजगारीची समस्या कायमच आहे. या मतदारसंघातील अनेक बेकार पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानूवर्ष हैदराबादला जात असतात. मात्र इथल्या राज्यकर्त्यांनी बेकारीच्या समस्येकडे कधीही लक्ष दिल नाही. 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभेची खडाजंगी : नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसमध्येच रस्सीखेच, हंबर्डे की पोकर्णा? कोणाला मिळणार तिकीट? महायुतीतही इच्छुकांची संख्या वाढली