Nanded Suicide News : नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने बँकेच्या सहायक व्यवस्थापकाची आत्महत्या (Suicide) केली.  हदगाव तालुक्यातील निवघा येथील आयडीबीआय बँकेत सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले विनोद रानमारे यांनी रविवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 


बीड जिल्ह्यातील धनगरवाडी येथील मूळ रहिवासी असलेले विनोद महादेव रानमारे (वय 26 वर्षे) मागील वर्षभरापासून येथील आयडीबीआय बँक शाखेत कार्यरत होते. मात्र मागील आठवड्यात या बँकेत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा झाली आणि एका वृत्तपत्रात याबाबत बातमी प्रकाशित झाली होती. ज्यात रानमारे यांनी 50 लाख रुपयांची रक्कम उमरखेड येथील स्टेट बँकेतील एका खात्यात वळती केली होती. एका मित्राच्या साहाय्याने ती रक्कम त्या खात्यातून उचलण्याआधीच त्याला ताब्यात घेतले होते. तर  अविनाश पंजाब फाळके आणि भगवान गडदे असे या दोघांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आपली पोलखोल होईल या भीतीने रानमारे याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मात्र आमच्या बँकेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. तशाप्रकारचे पत्र आम्ही पोलिसांना दिलं असल्याची माहिती बँकेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 


उपचाराच्या खर्चाच्या चिंतेने युवकाची आत्महत्या


दुसऱ्या एका घटनेत उपचाराचा खर्च कुटुंबाला पेलवणार नाही या चिंतेत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील एका युवकाने मुंबई येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माधव धोंडीबा कळसे (वय 31 वर्षे, रा.गडगा, ता. नायगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर माधव कळसे यास काही  दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता. नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला गंभीर आजार असल्याची शक्यता व्यक्त करत उपचारासाठी मुंबई येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. 6 जुलै रोजी माधव कळसे हा आईला घेऊन मुंबई येथे गेला. तेथे मावशीला सोबत घेऊन एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. तपासणीदरम्यान त्याला आतड्याचा कैंसर असल्याचे निदान झाले. दोन दिवस तेथेच थांबल्यानंतर माधवने 9 जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. माधव याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यावेळी माधव याच्या अंत्यसंस्कारासाठी मित्र परिवार आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन पैसे जमा केले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Beed News: धक्कादायक! स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील घटना