Nanded Sahastrakund Waterfall : जून महिन्यात पावसाने (Rain) पाठ फिरवली आणि आता थेट जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी धबधबे (Waterfall) कोसळताना पाहायला मिळत आहे. तर नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा (Sahastrakund Waterfall) देखील कोसळतांना पाहायला मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याचा प्रवाह सुरु झाल्याने हे पाहण्यासाठी नांदेडकर गर्दी करण्याची शक्यता आहे. 


पावसाने दांडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाह सुरु झाला नव्हता. त्यामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली होती. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांत नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगरपासून 15 किमी अंतरावर पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बाणगंगा धबधबा शनिवारी दुपारपासून खळखळला आहे. मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात धबधबा सुरू झाला होता. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 



  • अंदाजे 100 ते 150 फुटावरून सहस्त्रकुंड धबधबा कोसळतोय

  • सहस्त्रकुंड धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • या व्यंगमदृश्याचा आनंद पर्यटक 80 फुट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत.

  • धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर असल्याने दर्शनासाठी ही भावीक येतात.


पावसाची परिस्थिती...


नांदेड जिल्ह्यात जून महिन्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत 256.70 मिमी म्हणजेच 117टक्के पाऊस झाले होते. यंदा 218.40 मिमी पावसाची अपेक्षा असताना 1 जून ते 8 जुलैपर्यंत 120.90 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी 55.36 टक्के असल्याची नोंद करण्यात आली आहे. 


पाच मंडळात अतिवृष्टी...


जुन महिन्यात पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात देखील दमदार पाऊस झाला आहे. तर गेल्या आठवड्यातील झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. किनवट तालुक्यातील दहेली मंडळात 89.25 मि.मी., उमरी बाजार मंडळात 65 मि.मी., माहूर तालुक्यातील वाई मंडळात 88मि.मी., सिंदखेड मंडळात 70.25 मि.मी., हदगाव तालुक्यातील आष्टी मंडळात 74.50 मि.मी. पाऊस झाला आहे. या पाचही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


चोहिकडे हिरवळ, धुक्याची चादर अन् फेसाळलेले धबधबे; महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या आंबोलीत पर्यटकांची गर्दी