नांदेड: दिवाळीत नोकरी, शिक्षण आणि व्यवासायनिमित्त गावाकडे गेलेल्या नागरिकांनी  गावाकडे परतीचा वाट धरली. शहरातील एसटीस्थानके, खासगी बस थांबे, रेल्वे आणि विमानतळांवर घराची ओढ लागलेल्या प्रवाशांची लगबग बघायला मिळाली. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असून सर्व स्थानके प्रवाशांनी गजबजले आहेत. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून (Nanded Division - South Central Railway) दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत.
 
नांदेड दक्षिण मध्ये रेल्वे विभागातुन काही विशेष गाड्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून विविध ठिकाणी विशेष गाड्या चालवत आहे, त्या पुढील प्रमाणे 


 
1. 07082 (नांदेड – विशाखापट्टणम) 13.15 (शुक्र) 10.30 (शनि) 28.10.2022


2. 07083 (विशाखापट्टणम –नांदेड) 17.35 (शनि) 15.10 (रवी) 29.10.2022


गाडी क्रमांक 07082 नांदेड - विशाखापट्टणम विशेष गाडी


ही विशेष गाडी मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनापल्ली, गुंटूर, विजयवाडा, गुढीवाडा, कैकल्लूर, अकिवडू, भीमावरम टाऊन, तनुकू, निदादावोलू, राजमुंद्री, समलकोट, अन्नवरम, तुनी, अनकापल्ले आणि दुव्वाडा  स्थानकांवर थांबेल.


 गाडी क्रमांक 07083 विशाखापट्टणम- नांदेड स्पेशल ट्रेन:


ही विशेष गाडी दुव्वाडा, अनकापल्ले, अन्नावरम, समलकोट, राजमुंद्री, ताडेपल्लीगुडम, एलुरू, रायनापाडू, मढीरा, खम्मम, वारंगल, काझीपेठ, सिकंदराबाद, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर आणि मुदखेड स्थानकांवर थांबेल.


काही दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला.  त्यामुळे दिवाळीच्या काळातील वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता, चोरीच्या तसेच अन्य घटना घडू नये यासाठी रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. रेल्वे स्थानकांसह रेल्वे गाडीत देखील गस्त वाढवण्यात आली आहे. लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांनी दामिनी पथकासह एक विशेष पथक रेल्वेत कार्यरत केले आहे.  पुढचे काही दिवस पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या विविध रेल्वेमध्ये हे कर्मचारी काम करणार आहेत. वाढत्या गर्दीमुळे चोरीच्या किंवा इतर  घटना घडू नये यासाठी रेल्वेकडून विशेष काळजी घेतली जात आहे.  खास दीपावलीनिमित्त होणाऱ्या गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या :


Crime : सरपंचाच्या मुलीचं ड्रायव्हरसोबत अफेयर, रेल्वे ट्रॅकवर मिळाला दोघांचा मृतदेह, ऑनर किलिंगची शंका