Nanded Rain News: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, याचा फटका नांदेड जिल्ह्याला देखील बसला आहे. नांदेड जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरीच्या 133 टक्के पाऊस झाला असून, 93 पैकी 83 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यावर्षी अतोनात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. 

नांदेड जिल्ह्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. दरम्यान संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मात्र त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे 93 पैकी तब्बल 83 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली आहे. यामुळे खरीप हंगामाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान तर झालेच आहे, पण रब्बी हंगामाची पेरणी करण्यासारखी देखील परिस्थिती उरलेली नाही. 

अ.क्र.  तालुका  पाऊस (मिलिमीटर)
 1 किनवट 1453
2 धर्माबाद  1434
3 उमरी  1337
4 हिमायतनगर  1389
5 माहूर  1279
6 मुदखेड  1250
7 भोकर  1290
8 नांदेड  1148
9 बिलोली  1132
10 मुखेड  1047
11 हदगाव  1023
12 अर्धापूर  1065
13 नायगाव  1071


13  तालुक्यांमध्ये एक हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस...

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 891 मिलिमीटर पाऊस होतो. मात्र यावर्षी 1 हजार 156  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 16 पैकी 13  तालुक्यांमध्ये एक हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. आहे. ज्यात किनवट तालुक्यात सर्वाधिक 1453  मिलिमीटर, तर त्याखालोखाल धर्माबाद तालुक्यात 1434 मिलिमीटर पाऊस झाला आहे. कंधार, लोहा आणि देगलूर या तालुक्यात एक हजार मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

कापसाच्या शेतात केली गांजाची लागवड, गुन्हा दाखल, अडीच लाखांचा गांजा जप्त