Nanded : महावितरणमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी अरुण बेंद्रीकर यांचे शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान अपघाती निधन झाले. ही बातमी कानावर येतात रात्री दीडच्या दरम्यान पत्नी स्नेहा अरुण बेंद्रीकर हिने गळफास लावून आत्महत्या केली. बेंद्रीकर दाम्पत्याला दोन-वर्षांची मुलगी आहे. मात्र, आईने आत्महत्या करत चिमुकलीला पोरक केलंय. या घटनेने बेंद्री, तालुका नायगाव येथे शोककाळा पसरली आहे.     


पतीच्या निधनाने धक्का मानसिक, पत्नीची गळफास लावून आत्महत्या 


अधिकची माहिती अशी की, अरुण बेंद्रीकर (वय-30) हे विष्णुपुरी येथे महावितरणमध्ये कर्मचारी होते. विष्णुपुरी येथून शनिवारी (दि.6)रात्री बेंद्री या त्यांच्या गावी दुचाकीवरून जात असताना कहाळा-गडगा रस्त्यावर मांजरमजवळ यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना कळल्यानंतर त्यांच्या पत्नी स्नेहा बेंद्रीकर(27) यांना धक्काच बसला. त्यांनी रात्री दीड वाजेदरम्यान घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. 


दामप्त्यावर शवविच्छेदन होणार 


अरुण यांच्या बचत आई वडील दोन भाऊ एक मुलगी असा परिवार आहे. अरुण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन विष्णुपुरी शासकीय रुग्णालयांमध्ये, तर स्नेहा यांच्या मृतदेहावर नायगाव येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. या दाम्पत्यावर बेंद्री येथे रविवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


मुलीच्या हातातील दूध संपण्याआधीच जीवन संपविले


पतीच्या अपघाताची घटना समजतात कुटुंबीयांनी पत्नीसह नांदेड येथील शासकीय रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉक्टरांनी अरुणचा मृत्यू झाल्याचे कळविले व सकाळी मृतदेह ताब्यात देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर अरुणच्या पत्नीला गावाकडे पाठवून दिले. रात्री दीडच्या सुमारास काही महिला तिच्यासोबत बसलेल्या होत्या. मात्र, मुलीला पिण्यासाठी दूध देतो असे म्हणून ती एका खोलीमध्ये गेली. मुलीला पिण्यासाठी दूध दिले व मुलीचे दूध संपण्या अगोदरच तिने गळफास लावून आत्महत्या केली.


इतर महत्वाच्या बातम्या 


'भीतीदायक मृत्यू नको' म्हणत स्टेटस ठेवलं अन् चार तासांत होरपळून मृत्यू, संभाजीनगरातील मृताच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा!