नांदेड : शहरातील शांततेत सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार (Abinash Kumar IPS ) यांनीच गालबोट लावल्याचं दिसून आलं. अनंत चतुर्थीला मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असूनही रात्री 9.30 वाजताच पोलिस अधीक्षकांनी ती थांबवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. यामुळे सर्व गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. 


नांदेडमध्ये मंगळवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून मोठ्या भक्तीभावाने, वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी झाली. मिरवणुकीला सुरुवात झाली मात्र शांततेत सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीला चक्क पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनीच गालबोट लावले. 


साडे नऊ वाजताच लाठीचार्ज सुरू


जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीसाठी पहिल्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती.  मात्र मोठ्या उत्साहाने सुरू असलेल्या मिरवणुकीवर पोलिस अधीक्षकांनी लाठीचार्ज केला. संध्याकाळी साडेनऊ वाजता पोलिस अधीक्षक अविनाश कुमार हे मिरवणूक स्थळी आले त्यानंतर त्यांनी चक्क लाठी चार्ज करत गणेश भक्तांना झोडपून काढले.


पोलिस अधीक्षकांच्या या कृतीमुळे गणेश भक्तांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली. रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असताना नांदेड पोलिसांनी मात्र दहा वाजेपर्यंतच परवानगी असल्याचे सांगितले. गणेश भक्तांनी संयम दाखवत विसर्जन मिरवणूक ही आटोपती घेतली. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये 15 गणेश भक्तांच्या अंगावर चांगल्याच जखमा पाहायला मिळालं. 


ही बातमी वाचा: