पुणे: गेले दहा दिवस महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटात पार पडला. पण गेल्या काही काळात या उत्सवाच बदलत गेलेल स्वरूप आणि विसर्जन (Pune Ganpati Visarjan) मिरवणुकांमधील कर्णकर्कश गोंगाट पाहता हे सगळं धर्मशास्त्रात बसतं का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर तासंतास चालणाऱ्या मिरवणुकांमुळे शहरात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळतेय. या दिवसात अनेकांना वाहतूक कोंडी आणि आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.


गणेशोत्सवातील  (Pune Ganpati Visarjan) दहा दिवसांमध्ये असलेले मांगल्याचे, सात्विकतेचे वातावरण विसर्जनाच्या (Pune Ganpati Visarjan) शेवटच्या दिवशी मात्र पुर्ण बदलून जातं. गणेशोत्सव म्हणजे पवित्र व्रतं पार पाडणं. ईश्वराच्या सगुण साकार स्वरुपाकडून निर्गुण निराकार साधनेकडे प्रवास करणं असं धर्मशास्त्र सांगतं. मात्र आज गणेशोत्सवाला आलेल्या स्वरूपामुळे हा मुळ उद्देश मागे पडल्याच धर्म अभ्यासक म्हणतायत. गणेशोत्सवातील हे बदललेलं वातावरण कळस गाठतं ते विसर्जन मिरवणुकीत  पुण्या-मुंबईत ही विसर्जन मिरवणूक तासंतास चालते. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख रस्ते दोन दिवस बंद राहतात ज्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.


लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत लोकसहभाग वाढावा यासाठी घरातील गणपती रस्त्यावर आणून त्याचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक कलाकारांना या उत्सवाने व्यासपीठ मिळवून दिलं. आधी लोकवर्गणीतून साजरा होणारा हा उत्सव लोकांनां आपला वाटायचा. पण हळूहळू याला इव्हेंटचे स्वरुप येत गेल्यानं धर्मशास्त्रात न सांगितलेल्या गोष्टींचा शिरकाव उत्सवात झाला.


१३० वर्षांच्या कालावधीत या गणेश उत्सवाने अनेक चढउतार पाहिलेत. चांगले - वाईट बदल स्वीकारत हा उत्सव यशस्वीपणे वाटचाल करत आलाय. त्यामुळे नजीकच्या काळात या उत्सवात शिरलेल्या चुकीच्या प्रथा लवकरच बंद होतील ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. 


यावर्षीही पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुका चालल्या 28 तासांपेक्षा जास्त


शहरात काल सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आता संपली आहे. 189 गणेश मंडळे अलका चौकातून गेली आहेत. शहरातील विसर्जन मिरवणूक  (Pune Ganpati Visarjan) ही 28 तासांपेक्षा जास्त काळ चालली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 172 मंडळ अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत.  कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यांवरील अनेक गणपती अजूनही अलका टॉकीज चौकात पोहोचणार आहेत. मागच्या वर्षी एकूण 239 मंडळ होती. मागच्या वर्षी 4 वाजून 20 मिनिटांनी शेवटचा गणपती अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाला होता.