Nanded Crime : नांदेड शहरातील आनंद नगर भागात  एका सतरा वर्षीय  युवकाचा खून करण्यात आला. आनंद नगर भागातील राज मॉल येथे आज (दि.22) सायंकाळी ही घटना घडली . 17 वर्षीय साईनाथ  कुळेकर असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. तोंडाला रुमाल म्हणून आलेल्या तिघांनी एका  कापड दुकाना बाहेर त्याच्यासोबत वाद घातला  आणि तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले. या घटनेत   साईनाथ कुळेकर हा गंभीर जखमी झाला . उपचारासाठी त्याला  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.


जळगावमध्ये माहेरच्या लोकांनी केली जावयाची हत्या 


प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून माहेरच्या लोकांनी मुकेश शिरसाट या आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना जळगाव शहरात पिंप्राळा हुडको भागात घडली होती. या घटनेत आपल्या मुलाची हत्या होताना प्रत्यक्ष त्याच्या आई वडिलांना पाहिलं अन् टाहो फोडलाय. प्रेम विवाह केला म्हणून आपल्या मुलावर मुलीच्या माहेरच्या लोकांच्या सह त्यांच्या नातेवाईक परिवाराची खुन्नस होती. यातूनच त्यांनी भर चौकात आपल्या मुलावर विळे,कोयत्याने हल्ला चढविला,यावेळी प्रत्येकाच्या हातात शस्त्र असल्याने आपण आपल्या मुलाला वाचू शकलो नाही. आपल्या डोळ्या देखत त्यांनी त्याच्यवर हल्ला करून मारले.
 
या घटनेसंदर्भात आपण अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार घेऊन गेलो आहोत,मात्र पोलिसांनी घरची भानगड म्हणून त्याची फारशी गंभीर दखल घेतली नाही, त्या मुळेच आपल्या मुलाचा जीव गेला आहे. आपल्या सुनेचे आणि तिच्या लहान बाळाच्या आयुष्याच्या प्रश्न आता निर्माण झाला आहे.  आमच्या कुटुंबाचं आयुष्य खराब करणाऱ्या या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी मयत मुकेश शिरसाटचे कुटुंबीय आता करत आहेत.




इतर महत्त्वाच्या बातम्या


Dhananjay Deshmukh: पंकजाताईंनी एकदा व्हिडीओ कॉल केला, पण धनुभाऊंनी साधी विचारपूस केली नाही; संतोष देशमुखांच्या भावाची खंत


बांग्ला टू इंडिया व्हाया कोलकाता; सीमेवरची नदी ओलांडली अन् भारतात आला; कामाच्या शोधात मुंबईत पोहोचला, मोठा हात मारून बांगलादेशला पळण्याचा कट