Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशमधून अवैधरित्या घुसखोरी करुन भारतात आल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपी भारत-बांगलादेश सीमेवर नदी ओलांडून भारतात आला होता. भारतात आल्यावर तो पश्चिम बंगालमध्ये काही दिवस वास्तव्यास होता, तिथे त्याने बनावट कागदपत्र बनवले आणि तो मुंबईत कामाच्या शोधात आला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी मोहम्मद सध्या पोलिस कोठडीत असून सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.


एकदाच मोठा हात मारून बांग्लादेशला पळण्याचा कट


अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (30) मोठा हात मारण्याच्या उद्देशाने मुंबईत आला होता. रिक्षा चालकाकडून त्याने मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीतील माहिती घेतली. मोहम्मद शहजाद हा बांग्लादेश आणि मेघालयमधील डावरी नदी ओलांडून भारतात आला होता. एकदाच मोठा हात मारून बांग्लादेशला पळण्याचा कट होता. यासाठी त्याने मुंबईतील पॉश एरियामध्ये चोरी करण्याचा कट रचला.


आधीही भारतात आला होता शहजाद


शहजादच्या घरी आई, बहिण भाऊ असून वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. या आधीही शहजाद भारतात आला होता. मात्र छोटं-मोठं काम करून फारसं काही हाती मिळत नव्हतं. त्यामुळे घरची परिस्थिती पाहता सात महिन्यापूर्वी पुन्हा शेहजाद हा भारतात आला. हाताला अपेक्षित काम मिळत नसल्यामुळे एकदाच मोठा हात मारून बांग्लादेशला पळण्याचा त्याने कट रचला. हल्ल्यावेळी सैफने त्याला पकडलं, त्यावेळी सैफने पोलिसांच्या ताब्यात देण्याचं वक्तव्य केल्यानंतरच त्याने सैफवर स्वत:च्या सुटकेसाठी हल्ला केला. 


बनावट आधारकार्ड वापरून सिमकार्ड खरेदी


सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीने मोहम्मद शहजादने सिमकार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालमधील कागदपत्र वापरल्याचं समोर आलं आहे. आरोपीने बांगलादेशमधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये बनावट आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केलं आणि त्यानंतर मुंबईला आला. आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने सिमकार्ड  घेतलं होतं. 


सैफवर हल्ला केल्यानंतर तिथल्याचं गार्डनमध्ये झोपला 


बांगलादेशमधून (India Bangladesh Border) मेघालयमधल्या (Meghalaya) डावकी नदी (Dawki River) ओलांडून आरोपी पश्चिम बंगालमध्ये आला होता. मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या इसमाने त्याला इथे कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचेही समोर आले आहे. आरोपीने पहिल्यांदा चौकशीत तो कोलकाताचा रहिवाशी असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केले असल्याचे समोर आलं होतं. पोलिसांनी आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रे मागवली असता कागदपत्रांनुसार तो बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालं आहे. हल्ल्यानंतर आरोपी सैफ अली खानच्या घरातून निघाला आणि तिथल्याच एका गार्डनमध्ये झोपला होता, असेही समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Saif Ali Khan : हल्लेखोराला पुन्हा सैफच्या घरी नेलं, पोलिसांकडून क्राईम सीन रिक्रिएट; हल्लेखोर मोहम्मदकडून A to Z घटनाक्रम जाणून घेतला