Nanded News : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बारड तालुक्याच्या मुदखेड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुदखेडच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यायात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या सपना सतीश पेढे (रा. निवघा ता मुदखेड) या विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीतून विहरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मयत सपना मुदखेडच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यायात बारावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान शाळेत जातांना काही तरुणांकडून छेडछाड करणे, शिट्या मारणे, दुचाकी घेऊन मागे पुढे फिरणे, आवाज देणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सपना चिंतेत होती. तर रोजच्या छेडछाडीला कंटाळून तिने याबाबत घरच्यांना कल्पना दिली होती. त्यामुळे तिच्या परिवाराने गाव पंचायतीकडे तक्रारही केली होती. परंतू याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने, सपनाने विहरित उडी घेऊन आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलेले आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विद्यार्थ्यांसह पालकही हैराण
ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थांना शहरातील महागडे शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे बारड परिसरातील आजूबाजूच्या गावातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करावी लागते. मात्र काही टवाळखोर तरुणांकडून शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढली जात असल्याच्या घटना सतत घडत आहे. यामुळे अनेकदा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज स्वतः पालक नेऊन सोडत आणि घेण्यासाठी येत्तात. छेडछाड करणे, शिट्या मारणे, दुचाकी घेऊन मागे पुढे फिरणे, आवाज देणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थांसह पालकही हैराण झाले आहेत. यातच मुली लाजून काजून प्रकरणाची वाच्यता करीत नाहीत. त्यामुळे टोळक्याची हिम्मत वाढत आहे.
कठोर कार्यवाही करण्याची मागणी
विशेष म्हणजे या भागात यापूर्वी विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही पालकांनी छेडछाडीला कंटाळून गाव सोडून शहरात आपल्या मुला मुलींना शिक्षण घेण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. परंतु गोर गरीब घरातील मुली मात्र आजही गावगुंड, उनाड व रोडरोमिओचें बळी ठरत आहेत. मयत सपनाचे वडील सतीश पेदे यांनी या प्रकरणी जवाब नोंदविला असून, छेडछाडीचे कारण सांगितले आहे. तरी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून कठोर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने बँकेच्या सहायक व्यवस्थापकाची आत्महत्या; नांदेडमधील धक्कादायक घटना