Ashok Chavan : आता अजितदादा (Ajit pawar) हे अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळं गेलेल्या आमदारांनी परत इकडे यायला  हरकत नाही असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. आता घ्याचे की नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी ज्यावेळी बंड केले त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. आम्हाला अजितदादाकडे न्याय भेटत नाही आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंना सोडून आमदार दुसऱ्यासोबत गेल्याचे चव्हाण म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. 


राजकारण  IPL सारखे झाले


राजकारण हे IPL सारखे झाले आहे. आपण यामध्ये कुठं बसतो हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडला आहे. मीडियावर बोलताना आम्ही खूप सांभाळून बोलतो. सध्या राजकारणच स्तर घसरत चालला आहे. Ipl प्रमाणे बोली सुरु आहे. दुर्दैवाने अपात्रतेचा कायदा आहे, मात्र त्याची पायमल्ली झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. कोर्टात तारिक पे तारिक सुरु आहे. राजकारणाची दिशा कुठं जात आहे, कोण कुठल्या पक्षात आहे कुठल्या गटात आहे हा मोठा कार्यक्रम झाला असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 


सुषमा अंधारे यांची नारायण राणे यांच्यावर टीका 


भाजपचे आमदार नितेश राणे जेव्हा माझ्यावर टीका करता तेव्हा वाटते कुठं बारक्या पोरावर टीका करायची. तो आपला भाचा आहे. आता माझ्या भावानं त्यांच्या पोरावर संस्कार केले नाहीत असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. माझा भाऊ कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलत आहे. त्यामुळं भावाला पोराला संस्कार देण्यासाठी वेळ नाही अशी जहरी टीका अंधारे यांनी राणे पिता पुत्रावर केली.


गेल्या 15 दिवसापासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे रखडलेलं खाते वाटप अखेर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्याकडील काही खाती काढण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून खातेवाटपाबाबत चर्चा सुरु होती. अजित पवार त्यासाठी दिल्लीलाही गेले होते. अखेर गुरुवारी रात्री तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर खातेवापटावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.



अजित पवार गटाला मिळालेल्या खातेवाटपाची यादी... 


अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे - क्रीडा
आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनजंय मुंडे - कृषी खाते
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Cabinet Portfolio : अजित पवारांकडे अर्थ खाते, पाहा कोणाला कोणते खाते मिळाले?