Maharashtra Cabinet Expansion : मागील काही दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल रमेश बैस यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्याकडील काही खाती काढण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून खातेवाटपाबाबत चर्चा सुरु होती. अजित पवार त्यासाठी दिल्लीलाही गेले होते. अखेर गुरुवारी रात्री तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर खातेवापटावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
अजित पवार गटाला मिळालेल्या खातेवाटपाची यादी...
अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे - क्रीडा
आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनजंय मुंडे - कृषी खाते
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा
एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत.
1. कृषी
2. मदत आणि पुनर्वसन
3. अन्न आणि औषध प्रशासन
भाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.
1. अर्थ
2. सहकार
3. वैद्यकीय शिक्षण
4. अन्न नागरी पुरवठा
5. क्रीडा
6. महिला आणि बालकल्याण
महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीकडे कोणती खाती होती ?
वित्त आणि नियोजन
गृह खाते
ग्रामविकास
जलसंपदा
गृहनिर्माण
राज्य उत्पादन शुल्क
सामाजिक न्याय
सार्वजनिक आरोग्य
अन्न आणि नागरी पुरवठा
अन्न आणि औषध प्रशासन
अल्पसंख्यांक कामगार
अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत.
आणखी वाचा :
Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांकडे अर्थ, फडणवीसांकडे गृह कायम, पाहा कुणाकडे कोणती खाती?
Maharashtra Cabinet Portfolio : अजित पवारांकडे अर्थ खाते, पाहा कोणाला कोणते खाते मिळाले?