Nanded Rain News: नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आहे. चार दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. तर याच पावसामुळे शेतात पाणी तुंबले आहे. काढणीला आलेलं पीक काळ पडायला लागलंय. सुरवातीला पेरणी झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून उडीद, मुग, सोयाबीन, तूर ही पीक जवळपास 70 ते 80 टक्के हातची निघून गेली आहे. तर अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचं आता परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. नांदेडचे वार्षिक पर्जन्यमान 814  मिलिमीटर असून, आत्तापर्यंत 1046  मिलिमीटर पाऊस झाला आहे.


सोयाबीन, उडीद, मुग आणि कापूस ही काढणीला आलेली हातची पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलाय. दुबारपेरणी, अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाच्या तडाख्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी, अवकाळी आणि परतीच्या पावसाने सोयाबीन, उडीद, मुग आणि कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बाजारपेठेत आवक कमी असणार आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात यावर्षी पावसाला दमदार सुरवात झाली, मात्र एक महिन्याचा कालखंड पडल्याने पिकांवर अनेक प्रकारचे रोग पडले. 


नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातील शेतामध्ये नुकसानीचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात 70 टक्के पेक्षा अधिक सोयाबीन आधीच अतिवृष्टीमुळे वाया गेले आहे. त्यातच आता परतीच्या जोरदार पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काढणीस आलेली पीक अक्षरशः मातीमोल झाली आहे. त्यामुळे शेतात पिकांच्या जागी आता फक्त नुकसान झालेली पिकांचे अवशेष शिल्लक राहिल्याचे पाहायला मिळत आहे. 


मदत कधी मिळणार... 


नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीनंतर प्रशासनाने आणि नेत्यामंडळींनी अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची माहिती देत याच नेत्यांकडून मोठ्याप्रमाणावर घोषणांचा पाऊस देखील करण्यात आला. मात्र अजूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे हतबल झालेला बळीराजा आता प्रशासनाच्या मदतीकडे आस लावून बसला आहे. 


बळीराजा हतबल...


सतत चार दिवसांपासून पुन्हा पाऊस पडत असल्याने चिंता वाढली असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत बोलतांना नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पांडूरंग कदम म्हणतात की, आमचे बेहाल झाले आहे. आधी पेरणी केली, त्यानंतर पुन्हा एकदा दुबारपेरणी करावी लागली. मात्र त्यानंतर सुद्धा पुन्हा अतिवृष्टी झाली. त्यामुळे आता हातचं सगळ आम्ही गमावून बसलो आहे. सरकराने काहीतरी मदत करायला पाहिजे, असेही कदम म्हणाले. 


महत्वाचे बातम्या...


Maharashtra Rain : नांदेडसह परभणीला जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शेती पिकं मातीमोल होण्याची शक्यता, शेतकरी संकटात


Nanded: नांदेडचे व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपी ताब्यात, अल्पवयीन आरोपीला दिल्ली पोलिसांनी गुजरातमध्ये पकडलं