Nanded News : नांदेडमधील (Nanded) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (Swami Ramanand Teerth Marathwada University) साडेपाचशे एकर जमिनीत वर्षाकाठी दहा कोटी लिटर पावसाचे पाणी (Rain Water) अडवून विद्यापीठातील पाणीटंचाईवर तर मात करण्यात आलीच शिवाय हरित विद्यापीठ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने (Department of Civil Engineering) ही कमाल साधली आहे.


स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची मदत


एक अभियंता समाजातील प्रश्नांवर चुटकीसरशी उपाय शोधू शकतो. अभियंत्यांच्या कौशल्यातून निर्माण झालेल्या विविध संकल्पना समाजासाठी हितकारक ठरतात. असाच प्रयोग येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु उद्धव भोसले आणि कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी 'क्लीन सिटी ग्रीन सिटी' ही संकल्पना मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सुरुवातीला पाण्याचे नियोजन करणं आवश्यक होते. त्यासाठी विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची मदत घेण्यात आली. साडेपाचशे एकर क्षेत्रावर विद्यापीठाच्या विविध इमारती आहेत. तसेच विविध विभाग कार्यरत आहेत. विद्यापीठ परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची योग्य नियोजन केले तरच हे साध्य होणार असल्याने स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, भूगर्भशास्त्र विभागातील अधिकारी कामाला लागले.


कसं केलं नियोजन?


कार्यकारी अभियंता डॉ. तानाजी हुसेकर, भूगर्भशास्त्र विभागाचे डॉ. अविनाश कदम यांनी पावसाचे पाणी जिरवण्याची योजना आखली. त्यातून विद्यापीठातील प्रत्येक इमारतीवर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला. तसेच विद्यापीठाच्या परिसरात नऊ तळे बांधली. या तळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यात आले. पावसाच्या पाण्याचा एकही थेंब बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने नियोजन केलेत्यामुळे वर्षाकाठी सुमारे 10 कोटी लिटर पाणी या भागात अडवले जात आहे. पाण्याची सुबत्ता वाढल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन हा परिसर विकसित केला. आज त्याचे प्रत्यक्ष रुप पहावयास मिळत आहे. अभियांत्रिकी विभाग आणि भूगर्भशास्त्र विभागाच्या संशोधकांनी केलेल्या या योग्य नियोजनामुळे विद्यापीठ भागातील पाण्याची टंचाई दूर झाली आहे.


केवळ विद्यापीठच नाही शेजारील वसाहती, गावांमधील पाणी पातळी वाढली


पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन केल्याने विद्यापीठाच्या परिसरातील हातपंप, विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या भागात जाणवणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. विशेष म्हणजे, केवळ विद्यापीठ परिसरातच नव्हे तर शेजारील वसाहती आणि गावांमधील पाणी पातळीतही वाढ झाल्याची नोंद येथील अभियंते व शास्त्रज्ञांनी घेतली