नांदेड : दिवाळीचा सण तोंडावर असल्याने खरेदीसाठी लागणारे पैसे बँकेतून काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. तर, याच गर्दीचा फायदा उचलत काही भामटे नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहे. नांदेडमध्ये देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. दिवाळीसाठी एका मुख्याध्यापकाने बँकेतून 90 हजार रूपये काढले. परंतु, बँकेतून गाडीपर्यंतही जात नाही, तोच चोरट्याने हातचालाखी करत त्यांचे 90 हजार लंपास केले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील एसबीआय बॅंकेत बुधवारी दुपारी घडली. 


अधिका माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत साहेबराव देशमुख मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी 2 वाजता ते पैसे काढण्यासाठी हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बैंकेच्या शाखेत गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या खात्यातून 90 हजार रुपये काढले. तसेच, काढलेले पैसे स्वतः जवळ असलेल्या बॅगमध्ये टाकून बॅग पाठीवर अडकवली. यावेळी दोन चोरटे त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. साहेबराव देशमुख बँकेत असताना एक चोरटा पिशवी घेऊन त्यांच्या मागे खेटून चालू लागला. बॅगची चैन काढून त्याने अलगद आपल्या पिशवीमध्ये पैसे काढून घेतले. चोरट्यांनी अवघ्या 4 ते 5 सेंकदात मुख्याध्यापकाचे 90  हजार रुपये लंपास केले. 


चोरीचा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कैमेरात कैद 


चोरी होतांना थोडीही शंका देशमुख यांना आली नाही.पण काही वेळाने बॅगेचे वजन अचानक कमी झाल्याने त्यांनी बॅगची पाहणी केली आणि पैसे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा चोरीचा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कैमेरात कैद झाला आहे. चोरीच्या घटनेने बँकेत खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर साहेबराव देशमुख यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर, सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


अवघ्या 4 ते 5 सेकंदात हा प्रकार घडला. 


साहेबराव देशमुख भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत दुपारी 12 वाजता आले. सुरुवातील बँकेत आल्यानंतर त्यांनी कॅश काउंटरवरुन खात्यातील 90 हजार रुपये काढले आणि ही रक्कम पाठीवरील बॅगेत ठेऊन ते बँकेबाहेर पडत होते. विशेष म्हणजे, त्यांच्यावर सुरुवातीपासून नजर ठेऊन आसलेल्या अज्ञात दोघांनी बँकेतून रक्कम काढताना देखील मुख्याध्यापकांनी बँकेतील आसनावर ठेवलेल्या हिरव्या वायरच्या पिशवीच्या हात घालून तपासणी केली. मात्र त्यांना काहीच सापडले नाही. पण, जेव्हा देशमुख यांनी रक्कम काढली व बॅगेत ठेवून ते बँकेतून बाहेर पडतानाच 90 हजार रुपये या दोघांनी हातोहात पळविले. अवघ्या 4 ते 5 सेकंदात हा प्रकार घडला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Crime News : हातात तलवारी अन् थेट सपासप वार; नांदेडमध्ये तरुणाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद