नांदेड : सरकार बदलल्यावर एका वर्षातच हे रुग्ण मृत झाले,असा विरोधी पक्ष सूर लावत आहेत. त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आणि जागाही नाही. घटनेतून विरोध राजकीय सलाईन घेऊन विरोधकांकडून राज्यात वणवा पेटवण्याचे काम सुरू झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.
विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आज चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली दरम्यान त्यांनी पत्रकाराची संवाद साधला. पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आरोग्य हा सरकारचा पहिला प्राधान्यक्रम आहे. घटना घडल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आले. एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले. यामध्ये काय त्रुटी आहे, त्यासंबंधी योग्य निर्णय घेतले गेले. 2800 पदांची भरती मॅटच्या स्टेमुळे थांबली होती तोही मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री आरोग्य विभागाशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच आरोग्य अधिकारी, विभागीय अधिकारी यांची समिती तयार करून आपल्या परिसरातील रुग्णालयाला भेटी देऊन काय कमी आहे याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विरोधकांनी येताना एका डॉक्टरला सोबत आणावं
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आयसीयूमध्ये कधीच औषधांचा तुटवडा नव्हता. त्यादिवशी घटना घडली, आम्ही डॉक्टर नाहीत पण रेकॉर्डवरील माहिती देत आहोत. तीन वर्षाच्या रेकॉर्डवरून रुग्ण हे अत्यवस्थेत या ठिकाणी आणले जातात असं समोर येतंय. खाजगीत उपचार संपल्यावर रुग्ण घरी घेऊन जा म्हणून सांगण्यात येतात. त्यावेळी रुग्ण येथे आणतात हे सरकार बदलल्यावर एक वर्षातच हे रुग्ण मृत झाले,असा विरोधी पक्ष सूर लावत आहेत. त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आणि जागाही नाही. जे इथे येऊन भपारे सोडून गेले ते कोणी डॉक्टर नाहीत. माझ्या नंतरही काही महानुभव येणार आहेत, त्यांना मला सांगायचे तुम्ही येताना एका डॉक्टरला घेऊन या, तो तुम्हाला नीट सांगू शकेल. 2020 ते 2023 पर्यंत रोज सरासरी 13 जणांचा मृत्यू होतो. त्यावेळी एका दिवशी हे झाले नाही.
Chitra Wagh On Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
एकही माणूस दगावला तर आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे, परंतु ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचे मानसिक आजारपण लोकांना दाखवले त्याची मला कीव येते असं चित्रा वाघ म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, या घटनेतून विरोध राजकीय सलाईन घेऊन गेले. त्यांनी सगळ्या राज्यात वनवा पेटवण्याचे काम चालू केले, याचे वाईट वाटते. अडीच वर्ष तुमचे सरकार होते, इथे त्या ताई मोठे मोठे भपकारे मारून गेल्या. विसरले का तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान मुले डॉक्टरांमुळे नाही तर शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली होती. त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला त्यावेळी, का नाही मागितला आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा? राजेश टोपे तुमच्या जवळचे होते. मला या प्रश्नांची उत्तरे पाहिजे. सगळ्या शासकीय रुग्णालयाचे ऑडिट करू म्हणून गर्जना केली होती. किती हॉस्पिटलचे ऑडिट केलं?
आमचं फेसबुकवरील सरकार नाही तर अॅक्शन मोडचे आहे, मला या सगळ्या आठवणी करून द्यायच्या आहेत विरोधकांना असे चित्रा वाघ म्हणाल्या.
ही बातमी वाचा: