छत्रपती संभाजीनगर : माजी पर्यावरणमंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज नांदेड (Nanded) जिल्ह्याचा दौरा करणार असून, दुपारी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयाला भेट देवून माहिती घेणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि नागपूर (Nagpur) येथील शासकीय रुग्णालयांना देखील भेट देणार आहे. यावेळी ते त्या त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा देखील घेणार आहे.
नांदेड शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भेट देवून पाहणी केली. त्यात आता सोमवारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही नांदेडला येणार आहेत. सकाळी 10.40 वाजता ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर विधान परिषदचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात जातील. तसेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात भेट देऊन ते नागपूर येथील शासकीय रुग्णालयात जाणार आहे.
आमदार आदित्य ठाकरे आज (09 ऑक्टोंबर) रोजी संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देणार आहे. यावेळी ते रुग्ण संख्या, औषधांची मागणी,उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा करून, पाहणी करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात देखील पाहणी करणार
काही दिवसांपूर्वी म्हणजेच 3 ऑक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात (घाटी) आरोग्य सुविधा अभावी 14 रुग्ण एका दिवशी दगावले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची ही पाहणी भेट असणार आहे. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी आदित्य ठाकरे चिखलठाण विमानतळ येथे पोचणार आहे. तसेच 11 वाजता घाटीला जाणार आहेत. यासोबतच ते राज्यातील नांदेड व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची सुद्धा पाहणी करून अधिष्ठातांसोबत वैद्यकीय सुविधा बाबत चर्चा करणार आहेत.
असा असणार दौरा...
- सकाळी 10.40 वाजता : चिकलठाणा विमानतळ येथे आदित्य ठाकरे यांचे स्वागत.
- सकाळी 11 वाजता : छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे भेट आणि रुग्ण संख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे या संदर्भात अधिष्ठाता यांच्या समवेत चर्चा करणार.
- सकाळी 11.55 वाजता : छत्रपती संभाजीनगर येथून नांदेडकडे प्रयाण.
- दुपारी 12.45 वाजता : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट. तसेच रुग्ण संख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे या संदर्भात अधिष्ठाता यांच्या समवेत चर्चा करणार.
- दुपारी 1.40 वाजता : नांदेड येथुन नागपुरकडे प्रयाण.
- दुपारी 2.30 वाजता: नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट देणार. रुग्ण संख्या औषधांची मागणी, उपलब्ध साठा. रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे या संदर्भात अधिष्ठाता यांच्या समवेत चर्चा करणार आहे.
- दुपारी: 3.30 वाजता : नागपूर येथुन मुंबईकडे प्रयाण.
इतर महत्वाच्या बातम्या: