Nana Patole भंडारा : राज्यातले हे जनतेच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही. यांना जनतेची काळजी नाही. मलिदा कोणत्या खात्यात जास्त मिळतोय याच्यावर या तिघांचं सध्या ओढताण सुरू आहे. महाराष्ट्रात अजूनही धान खरेदी झालीय त्याचे पैसे दिलेले नाही. धान खरेदी केंद्र, सोयाबीन, कापसाचे सेंटर सुरू झालेले नाहीत. शेतकर्याची आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. महागाई पुन्हा झपाट्यानं वाढायला लागलेली आहे. बाकी यांना जनतेशी लेणंदेणं नाही.
जनतेची भीती त्यांच्या मनातून गेलेली आहे आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं हे पाप लपवत आहे. निवडणुकीत स्पष्टता आली नाही. त्यामुळे हे जनतेचं सरकार आहे की, नाही हाच संशय प्रत्येकाच्या मनात असल्याचा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळालेल्या भाजप सरकार अद्यापही सरकार स्थापन करीत नाही, तर शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले असल्याने त्यांच्यावर ही टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते निवडणूक निकालानंतर ते पहिल्यांदाच भंडाऱ्यात आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी, मुख्य निवडणूक आयोग, महायुतीचे नेते, आणि महायुतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारांसह आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबतही वक्तव्य केलं.
निवडणूक आयोगालाचं व्यवस्थित करायचंय
पुढच्या निवडणुकांना अजून वेळ आहे, त्याच्यापेक्षा जे काही आता निवडणुकांमध्ये गोंधळ निवडणूक आयोगाकडून झाला तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं हीत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीची चर्चा आज करण्यापेक्षा निवडणूक आयोगालाचं व्यवस्थित कसं करता येईल आणि लोकांच्या हक्काचे संरक्षण कसं करता येईल, हा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा असल्याची वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढतील का या विषयावर नाना पटोले बोलत होते.
70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालंय
झालेल्या मतदानाची स्पष्टता निवडणूक आयोग का देत नाही? याबाबत काँग्रेसनं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. रात्री उशिरापर्यंत कुठं मतदान झालं, त्याची सीसीटीव्ही फुटेजेस का देत नाहीत. 70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालेलं आहे. याच्या स्पष्ट ते बाबत मुख्य निवडणूक आयोग यांना आम्ही मेमोरेंडम नव्हे तर कायदेशीर नोटीस आम्ही दिलेलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टता दिली नाही तर, आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. माननीय सुप्रीम कोर्ट ही ऐकला नाही तर, रस्त्यावरची लढाई लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे. काही उमेदवारांना टेक्निकल बाबी लक्षात आल्या असल्यास त्यांनी अर्ज केलेला असावा. पवार साहेबांना त्याबाबतची काही माहिती मिळाली असेल त्या पुराव्याच्या आधारावर ते बोलत असतील, अशी खोचक ठेवा टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.
महिला अत्याचाराचे गुन्हे असलेल्यांना भाजपनं उमेदवारी देवून आमदार केलं
आकडेवारीवरून गुन्हेगारी स्वरूपाचे आमदारात भाजपात नंबर एक वर आहे. पार्टी विथ दी डिफरन्स. अशी जी कहानी भाजप नेहमी बनवायची, हा पार्टी विथ डिफरन्स आहे. महिला अत्याचाराच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तिकीट देऊन आमदार करण्याचं काम त्या लोकांनी (भाजपनं) केलं. त्यामुळं त्यांचा असली चेहरा जो आहे, तो यानिमित्तानं स्पष्ट झालाय की, गुंडाईजम हाच भाजपाचा मूळ पाया आहे. गुंडाईजमच्या आधारावर सत्ता घ्यायची आणि भ्रष्टाचार करायचा आणि राज्य लुटायचं, देश लुटायचं ही परंपरा भाजपनं केली आहे. हा त्याचाचं प्रत्यय आहे.
भाजपच्या आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हा त्याचाच प्रत्यय असल्याचा घराघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे राज्यातील 288 आमदारांपैकी 187 आमदारांवर गंभीर गुण स्वरूपाचे गुन्हे असून 118 आमदारांवर महिला अत्याचार खून आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहे यावर नाना पटोले बोलत होते.
हे ही वाचा