Vaishno Devi Yatra : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता माता वैष्णोदेवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या श्राइन बोर्डाने म्हणजेच देवस्थान समितीने भाविकांना खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा तुर्तास स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. शनिवारी, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कटरा शहरातील माता वैष्णो देवी मंदिराजवळ, मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. या ठिकाणी आलेल्या पुरामुळे हा दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. 


शनिवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा ही यात्रा सुरू करण्यात आली होती. माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ अंशुल गर्ग यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली होती. आपण सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले होते. सीईओ अंशुल गर्ग यांनी सांगितले होते की, प्रवासाच्या मार्गावर पाणी नव्हते. मात्र, खबरदारी म्हणून कटरा ते भवन हा प्रवास थांबवण्यात आला होता.


 






 


हिमाचल अतिवृष्टीमुळे यात्रा स्थगित 
याआधी हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता, अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. येत्या 5 दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. संपूर्ण राज्यात पुढील 12 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, 24 ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


यात्रेसाठी 27 हजारांहून अधिक भाविकांची नोंदणी
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कटरा ते भवन हा प्रवास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रवासासाठी 27 हजार 914 भाविकांनी आपली नोंदणी केली आहे. सीईओ अंशुल गर्ग यांनी माहिती देताना सांगितले की, आतापर्यंतच्या प्रवासात कोणालाही इजा झालेली नाही. त्याचवेळी प्रवाशांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दर अर्ध्या तासाने प्रवाशांना पुढील अपडेट्स देण्यात येत आहेत. तसेच, आपत्ती व्यवस्थापन पथकाला सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त 


Himachal Landslide : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर, पूर आणि भूस्खलनात 22 जण ठार, अनेक जण बेपत्ता