Weather Update Today : हिवाळा ऋतु संपण्यास अद्याप अवकाश आहे. मात्र विदर्भातील बहुतांश भागात थंडीचा (Winter)  जोर काही अंशी ओसरला असून फेब्रुवारीतच उष्णतेच्या झळा (Heat Waves) सोसाव्या लागत आहे. आज 4 फेब्रुवारीला विदर्भात (Vidarbha) गोंदिया (Gondia) वगळता उर्वरित विदर्भात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसवर गेले आहे. तर विदर्भातील किमान तापमान देखील यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आणि बुलढाणा वगळता 15 अंश सेल्सिअसच्या वर आहे. फेब्रुवारीत महिन्याचे तापमान जानेवारी प्रमाणेच बऱ्यापैकी थंडी जाणवत असते. मात्र अलीकडे झालेल्या वातावरणातील बदलामुळे फेब्रुवारीतच उन्हाळा अनुभवायला मिळतो का, अशी शक्यता बळावली आहे. 

कमाल आणि किमान तापमान आले सरासरीत

विदर्भवासियांना सध्या पहाटे आणि रात्री थंडी तर दिवसा उकडा जाणवत असल्याचे चित्र आहे. सध्यातरी विदर्भातील कमाल आणि किमान तापमान सरासरीत आले आहे. फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर गेल्या 10 वर्षात थंडीचा प्रभाव कायम राहिला आहे. 2019 ते 2023 या पाच वर्षांत किमान तापमान 10 अंशाखाली गेलेले आहे. 2019 मध्ये 10 फेब्रुवारीला 6.8 अंशांची नोंद झाली होती. 2013 आणि 2017 ला 12 अंशापर्यंत तापमान होते. अशातच यावर्षी काही दिवस वगळता फार थंडी जाणवली नाही. जानेवारी महिन्यात केवळ 25 जानेवारीला नागपूरचा पारा हा 8.7 अंशांवर गेला होता. त्यानंतर तो पुढे वाढतच गेला आहे. 

असे आहे विदर्भाचे आजचे तापमान

जिल्हे कमाल किमान
अकोला 32.6  15.6 
अमरावती 31.4  15.6   
बुलढाणा 31.4  11.3  
ब्रम्हपुरी 33.4   15.7  
चंद्रपूर 31.0  14.4 
गडचिरोली 30.2  15.6 
गोंदिया 29.5  13.6 
नागपूर 30.2   15.3 
वर्धा 31.0 15.6 
वाशिम 31.6  15.4 
यवतमाळ 33.0  14.4 

राज्यात गारठा पुन्हा वाढणार

वेस्टर्न डिस्टबर्न्स आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभाव यामुळे पुढील आठवड्यात राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. वाऱ्यांची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. या सर्व स्थितीचा प्रभाव राज्यातील हवामानावरही पडेल. त्यामुळे पुढील आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक भागात पावसाची शक्यता

हवामान विभागाने म्हटलं आहे की, वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामान काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा शनिवारपासून वायव्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असंही आयएमडीने (IMD) म्हटलं आहे. तसेच, हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातही आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

इतर महत्वाच्या बातम्या