Donald Trump Tariff War: भारतात 60 कोटी मध्यमवर्गीय ग्राहक असून एवढी तर अमेरिकेची लोकसंख्याही नाही. 145 कोटींचा भारतीय बाजार अमेरिकेच्या टॅरिफ टेररला (India America Tariff War) चोख उत्तर देईल. त्यासाठी फक्त येणाऱ्या सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांना स्वदेशी वस्तूंची (Indigenous products) खरेदी करायची आहे. तसे झाल्यास येणाऱ्या नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत अमेरिका गुडघ्यावर येईल, असा विश्वास स्वदेशी जागरण म्हणजे व्यक्त केला आहे. नागपुरात स्वदेशी जागरण मंचाच्या पुढाकाराने देशभरातील व्यापारी संघटनांची दोन दिवसीय मंथन बैठक सुरू आहे. या बैठकीत अमेरिकेच्या प्रचंड टेरिफ नंतर जागतिक बाजारपेठेत आणि व्यापार विश्वात होत असलेल्या उलथापालथबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संघटक सतीश कुमार यांनी 'एबीपी माझा'शी खास बातचीत केली.
Donald Trump: अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचे अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी स्वदेशी जागरण मंचाची योजना काय?
* टॅरिफचे संकट तात्कालिक संकट असून लवकरच अमेरिकेला गुडघ्यावर आणू. * भारतीय घरगुती बाजार 145 कोटींचा असून घरगुती बाजाराच्या प्रचंड मागणीमुळे भारत या टॅरिफविरोधात यशस्वीरित्या लढू शकतो.* 60 कोटी मध्यमवर्गीय ग्राहक भारतात असून अमेरिकेची तर एवढी लोकसंख्याही नाही. त्यामुळे मध्यम वर्गाची मोठी क्रयशक्ती भारतात असून जगात ती दुसऱ्या क्रमांकाची क्रयशक्ती आहे.* येणाऱ्या सणासुदीचा काळात भारतीय ग्राहकांनी स्वदेशीच्या जोरावर ट्रम्प आणि अमेरिकेला चोख उत्तर दिले पाहिजे.* ट्रम्प प्रशासनाने लावलेल्या ड्युटीमुळे भारत आणि अमेरिका दोघांचे नुकसान होत असून त्याचा अंदाज आता अमेरिकेला आला आहे. त्यामुळे आता त्यांची भाषा बदलली आहे.* नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ट्रम्पची भाषा पूर्णपणे बदलून जाईल आणि तेव्हा ट्रेड डील करायला येणाऱ्या अमेरिकेला आपण गुडघ्यावर आणू शकतो, असा विश्वास आहे. * अमेरिकेला भारतासोबत समपातळीवर येऊन ट्रेड डील करावीच लागेल.* स्वदेशीचा पुरस्कार करताना "सवयीतून देशी, आवश्यकतेतून स्वदेशी आणि फक्त मजबुरी मध्येच विदेशी" या नीतीचा अवलंब आम्हाला करावा लागणार. * अमेरिकेसोबत व्यापार युद्ध सुरु असले तरी आम्हाला चिनी वस्तूंचा पुरस्कार मुळीच करायचा नाही.* पंतप्रधान मोदी चीनला जाऊन आले याचा अर्थ असा नाही की, आपण चीन मधील वस्तू स्वीकारायला सुरू करायचे आहे. चीनच्या स्वस्त डम्पिंगच्या विरोधात आमचा लढा सुरू राहील.
आणखी वाचा
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल