Nagpur News  नागपूर : नागपूरच्या रामटेक तालुक्यातील नगरधन येथे एक भीषण अपघात झाला आहे. नगरधनच्या आठवडी बाजारात भजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एक युवक चुकून गरम तेलाच्या कढईत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी झालेल्या साप्ताहिक बाजारात हि दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत कुंवरलाल मसुरके (२५) असे मृत तरुणाचे नाव असून तो नगरधन परिसरातील रहिवासी होता.

Continues below advertisement

दारूच्या नशेत असल्याने तोल गेला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील नगरधन येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. याच बाजारात विक्की जनबंधु नावाचा व्यापाऱ्याने नाश्त्याचे दुकान लावले होते. दरम्यान भजी विक्रीसाठी त्याने कढईत गरम तेल तापवत ठेवले होते. त्या वेळी प्रशांत मसुरके हा तरुण दारूच्या नशेत असल्याने त्याचे तेथे तोल गेला आणि तो थेट गरम तेलाच्या कढईत जाऊन पडला. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटने त्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनतर स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी तातडीने प्रशांतला बाहेर काढून उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर भाजल्यामुळे त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) हलविण्यात आले. त्यांनतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरूवात केली, मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एसटी बसमध्ये चढून चालकाला प्रवाशाकडून मारहाण, चालक किरकोळ जखमी, गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केल्याची घटना जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील मेहकर - खामगाव मार्गावर घडली आहे. मेहकर खामगाव बस खामगावकडे जात असताना तुषार अर्जुन राठोड या तरुणाने आपली आई येईपर्यंत बस थांबवा, अशा चालकाला सूचना केल्या. मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील या तरुणाची आई आली नसल्याने चालकाने बस सुरु केली. त्यामुळे राग अनावर झालेल्या तुषार राठोड यांनी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केली. ज्यामध्ये चालक किरकोळ जखमी झाले असून, जानेफळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Continues below advertisement

आणखी वाचा