Nagpur Municipal Corporation News : महापालिकेत सत्तापक्ष व प्रशासन यांच्यात विकासकामांवरून कायम संघर्ष बघितला गेला. सत्तापक्षाने प्रशासनाला खुले आव्हान देतानाच समन्वय ठेवून इशाराही दिला आहे. सत्तासंघर्षाचा हा खेळ दीर्घकाळ चालला असला तरी प्रशासनाने सत्तापक्षाला खुश ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी ग्रीन जीम लावले. आज या ग्रीन जीमची योग्य देखभाल न ठेवल्या गेल्याने अनेक ठिकाणी लोखंडांचे सांगाडेच उभे आहेत. परिणामी, उद्यानात येणाऱ्यांना हे सांगाडे धोकादायक ठरत आहेत.


मनपाला ग्रीन जीमसाठी Green Gym डीपीसीतून (DPC) कोटयावधीचा निधी मिळाला. त्यानंतर शहरातील 96 ठिकाणी ते लावण्यासाठी यादीही तयार करण्यात आली होती. प्रारंभी निधी नसल्याची ओरड झाली. त्यानंतर निधी मिळताच ग्रीन जीम लावून देण्यात आले. याप्रकारे प्रत्येक मोकळ्या व्यायाम शाळांजवळ प्रति व्यायाम शाळा 7 लाख रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.


प्रशासन बघतोय अपघाताची वाट? संतप्त नारिकांचा सवाल


वर्धा मार्गावरील रामकृष्ण नगर उद्यानातही मोठा गाजावाजा करुन उद्यानात उपकरण लावण्यात आला. सुरुवातीला याचा वापरही करण्यात येत होता. मात्र मनपाकडून याची देखभाल झाली नसल्याने या उद्यानात काही उपकरणांचे केवळ सांगाडे उरले आहे. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्यानंतरही याकडे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मात्र हे लोखंडी सांगडे खेळणाऱ्या लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासन अपघात होण्याची तर वाट बघत नाही ना, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


15 मैदानात 90 लाखांचा खर्च


माहितीनुसार, 15 मैदानांवर खुले जीम लावण्यासाठी जवळपास 90 लाखांचा खर्च करण्यात आला. प्रत्येक जीमसाठी 6 लाख रूपयाचे अनुदान देण्यात आले. यात केवळ मनपाच नव्हे तर नासुप्रच्या मैदानांवरही ग्रीन जीमचे उपकरण लावण्यात आले. सोबतच अनेक मोठया संस्थांनाही ग्रीन जीमचे उपकरण भेट देण्यात आले. मनपाच्या 13 मैदानांवर ग्रीन जीम लावण्यात आले. परंतु, गेल्या वषीं 160 मैदानांवर निधी खर्च न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर 2022 च्या शेवटी ग्रीन जीम लावण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली होती.


डीपीसीतून मिळाला लाखोंचा निधी



  • डीपीसीतून 2017-18 मध्ये ग्रीन जीमअंतर्गत 15 मोकळया ठिकाणी जीम लावण्यात आला. यावर 90 लाख खर्च करण्यात आले.

  • 2018-19 मध्ये 64 ग्रीन जीम आणि खुली व्यायाम शाळेचे काम करण्यात आले. यावर 4.32 कोटीचा खर्च करण्यात आला.

  • 2019-20 मध्ये विकास अनुदान योजनेत जिल्हा नियोजन समितीने एकूण 11.12 कोटीची तरतूद केली.

  • 160 खुल्या व्यायाम शाळा आणि मैदानांवर व्यायाम साहित्य लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • दीर्घ काळापासून अधिकारी आणि नागपूर महानगरपालिकेच्या बेजबाबदार पणामुळे 160 मैदानांवर ग्रीन जीमचे उपकरणच लावण्यात आले नाही.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur Crime : प्रवचन ऐकण्यासाठी आला अन् दानपेटीवर डल्ला मारला ; नागपुरातील पोद्दारेश्वर मंदिर चोरी प्रकरण उलगडले