नागपूर : लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गमावणाऱ्या दोन तरुणी नागपुरात देहविक्रीच्या व्यवसायात उतरल्याचा दुर्दैवी प्रसंग समोर आला आहे. कोराडी भागात पोलिसानी टाकलेल्या छाप्यात दलालाच्या तावडीतून सोडवण्यात आलेल्या तरुणींनी नोकरी गेल्यामुळे देहविक्रीच्या व्यवसायात आल्याचे सांगितले. एकीची साड्यांवर डिझायनिंग करण्याची तर दुसरीची खासगी रुग्णालयातील नोकरी गेल्यामुळे दोघी या व्यवसायात आल्याची घक्कादायक माहिती समोर आलीय.


लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गमावणारे तरुण-तरुणी वाम मार्गाला लागत आहेत का? असे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गमावणाऱ्या दोन तरुणी नागपुरात देह विक्रीच्या व्यवसायात उतरल्याचे दुर्दैवी प्रसंग समोर आला आहे. नागपूर कोराडी मार्गावर विजयानंद सोसायटीमध्ये एका अर्धवट निर्माण झालेल्या एका घरात चंद्रशेखर मुदलियार नावाचा दलाल काही तरुणींकडून देह व्यापार करून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी काल संध्याकाळी अंधार झाल्यानंतर त्या ठिकाणी छापा घातला. तेव्हा त्या घरात चंद्रशेखर मुदलियार दोन तरुणींकडून बळजबरीने देह व्यापार करून घेत असल्याचे उघड झाले.


नागपुरात हत्यासत्र सुरुच! 11 दिवसांत जिल्ह्यात 11 तर शहरात 8 खून; आज कुख्यात गुंड बाल्या वंजारीची हत्या


नोकऱ्या गमावल्या लागल्याने वाममार्गाला
पोलिसांनी लगेच दलाल चंद्रशेखर मुदलियार याला अटक केली. दोन्ही तरुणींना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली. तेव्हा दोन्ही तरुणींनी लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वी दोघी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होत्या. एक तरुणी गुजरात मधील राजकोट या ठिकाणी साडीच्या कारखान्यात डिझायनिंगचे (साड्यांवर एम्ब्रॉयडरी) काम करायची. तर दुसरी तरुणी नागपुरात एका खासगी रुग्णालयात काम करायची. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर दोघींना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे बेरोजगार झालेल्या दोघींपुढे कुटुंबासाठी अर्थार्जनाचा प्रश्न उभा राहिला. एका महिलेच्या माध्यमातून दोघी चंद्रशेखर मुदलियारपर्यंत पोहोचल्या. मुदलियार याने दोघींना जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत देह विक्रीच्या व्यवसायात ओढले.


पोलिसांकडून तपास सुरू
गेले काही दिवस चंद्रशेखर मुदलियार दोघींकडून विजयानंद सोसायटीतील अर्धवट बांधकाम झालेल्या स्वतःच्या मालकीच्या घरातून देहविक्रीचे व्यवसाय करून घेत होता. ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करून तो या दोन्ही तरुणींना फार अल्प मोबदला देत होता. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही तरुणींची अशी फसवणूक झाली आहे का याचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, ज्या अर्थी नोकऱ्या गमावल्यानंतर तरुण तरुणी वाम मार्गावर लागतील अशी भीती निर्माण झाली आहे. त्याकडे पाहता समाजाने अशा तरुण तरुणींच्या पाठीशी उभे राहण्याची गरज ही निर्माण झाली आहे.


Brother-Sister Murder औरंगाबादेत बहीणभावाची निर्घृण हत्या,दीड किलो सोन्यासह साडेसहा हजार लंपास