नागपूर : शहरात सुरू झालेली हत्यांची मालिका थांबायची चिन्हे नाहीत. कारण गेल्या 11 दिवसात जिल्ह्यात 11 तर नागपूर शहरात 8 खून झालेत. या घटना ताजी असतानाच संध्याकाळी पारडी परिसरातील आठवडी बाजारात एका कुख्यात गुंडाची हत्या झाली आहे. आठवडी बाजारात किरकोळ वादातून पारडी परिसरातला कुख्यात गुन्हेगार बाल्या वंजारीचा खून करण्यात आला. त्यामुळे बाजारात गोंधळ माजला होता. यामुळे नागपूरमध्ये कायद्याचा धाक बिलकून राहिला नसल्याचे आरोप होत आहेत.


नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावर रविवारी संध्याकाळी आठवडी बाजार भरतो. याच बाजारत कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची हत्या करण्यात आली. बाल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. मृत बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला नागपूर शहरातून तडीपार देखील केले होते. मृत बाल्या वंजारी गेले काही दिवस परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढले होते. आज पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती समजताच आरोपी नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून धारधार हत्यारांनी त्याची निर्घृण हत्या केली.

पूर्ववैमन्यासातून खून
मिळालेल्या माहितीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी मृत बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याच वादाचे रूपांतर बाल्या वंजारीचा हत्येत झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नागपुरात खुनाच्या घटनांचे सत्र जवळपास रोजच सुरू आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 11 घटना घडल्या आहेत. त्यापैकी 8 घटना एकट्या नागपूर शहरात घडल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात

नागपूर बनतंय क्राईम कॅपिटल
राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात लॉकडाऊन नेमकं जनतेसाठी खुला करण्यात आलाय की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण म्हणजे गेल्या एका आठवड्यात नागपूर शहर आणि जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या अत्यंत गंभीर घटना. रस्त्यावर गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध, रस्त्यावर लुटीच्या घटना, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना आणि एकानंतर एक 12 हत्यांच्या घटना घडल्या आहे. अशा अत्यंत गंभीर घटनांनी कोरोनाशी लढणारा नागपूर जिल्हा गुन्हेगारीमुळे रक्तरंजित होताना दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारांनी शांतता भंग केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Mission Begin Again | आजपासून मिशन बिगिन अगेन, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये खबरदारी घेत दुकानं सुरु