Nagpur ZP : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राडा; साहित्याची फेकाफेक, माईक आणि बाकांची तोडफोड

Advertisement
एबीपी माझा वेब टीम   |  Edited By: अक्षय गांधी Updated at: 05 Dec 2022 10:04 PM (IST)

भाजपच्या संतप्त सदस्यांनी सभागृहातील साहित्याची व कागदपत्रांची फेकाफेक करत बाकांचीही तोडफोड केली. या गोंधळात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांना काँग्रेसचे बंडखोरांचीही साथ मिळाली.

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेतील विषयांवर चर्चा न झाल्यामुळे विरोधकांनी साहित्याची तोडफोड केली.

NEXT PREV

Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या सभापतींनी कार्यभार सांभाळल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सर्व साधारण सभेच्या ठरलेल्या विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करताच ते मंजूर केल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी भाजपच्या संतप्त सदस्यांनी सभागृहातील साहित्याची व कागदपत्रांची फेकाफेक करत बाकांचीही तोडफोड केली. या गोंधळात मुख्य विरोधी पक्ष (BJP) असलेल्या भाजपच्या सदस्यांना काँग्रेसचे (Congress) बंडखोर नाना कंभालेंचीही साथ मिळाली, हे विशेष. 

Continues below advertisement


जिल्हा परिषदेच्या नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच अनेक महिन्यांनंतर होत असल्याने अनेक मुद्दे गाजणार असल्याचा अंदाज होता. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी घोटाळे व स्थगितीचा मुद्दा समोर करण्याची रणनिती आखली होती. तसेच पद वाटपातही अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र रोष होता. त्यामुळे या सभेत सत्तापत्र कॉंग्रेसला विरोधक (भाजपा) सह स्वपक्षातील नाराजांचाही सामना करावा लागेल याची कल्पना होतीच. सभेतही याप्रकारेच घडले अन् भाजपच्या विरोधकांना काँग्रेसचे बंडखोर नाना कंभालेंचीही साथ मिळाली.


जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व 1 ते 10 विषय सर्वानुमते मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यास विरोधी पक्ष नेते आतिष उमरे यांनी आक्षेप घेतले. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केसी. परंतु, अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी चर्चेला नकार देत सर्व विषय एकतर्फी मंजूर केल्याचे जाहीर करीत सभा गुंडाळली. त्यामुळे संतप्त विरोधकांनी सभागृहातील टेबल, खुर्च्यांची फेकाफेक करीत तोडफोड केली. माइक फेकले, कागपत्रही भिरकावले.


नव्या सीईओंसमोर गोंधळ


नागपूर जिल्हा परिषदेत भाग्यश्री विसपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज त्यांचीही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. मात्र सभागृहात गोंधळ सुरु असताना त्या जागेवरच बसलेल्या दिसून आल्या. तसेच सुरु असलेल्या गोंधळावर त्यांनी बोलणे टाळले.


बंडखोरांमुळे वाढली कॉंग्रेसची डोकेदुखी


नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत अनेक इच्छुक वरिष्ठांना डावलण्यात आल्यामुळे त्यांच्यात खदखद होती. शिवाय आधीच सत्ताधारी गटाचे चार बंडखोर सदस्य भाजपला मिळाल्याने त्यांची शक्ती वाढली आहे. पशुधन वाटपाची चौकशी सुरु आहे. तर सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणातील कंत्राटदाराचे देयके वितरित करण्याचा प्रताप विभागाने केला आहे. त्याबाबत शासनाला कळविण्याचे औदार्य विभागाने दाखविले नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक होते. दलित निधी वाटपात झालेल्या भेदभावामुळे विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही नाराज आढळून आले.



विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा व्हावी. विषयांवर बोलण्याचा अधिकार सदस्यांना मिळावा याची मागणी आम्ही केली. मात्र यावेळी अध्यक्षांनी एका वाक्यात एक ते दहा सर्व विषय मंजूर केले. त्यांच्या या कृतीचा आम्ही विरोध दर्शवला. सभागृह हा चर्चेसाठी असतो. मात्र सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत आहे.- आतिश उमरे, विरोधी पक्षनेता, जिल्हा परिषद


ही बातमी देखील वाचा


Nagpur : आपल्या बाळाला गोवरची लस दिली का? मनपाकडून धर्मगुरू, एनजीओ, युनानी डॉक्टरांची आढावा बैठक

Published at: 05 Dec 2022 10:04 PM (IST)
Continues below advertisement
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.