नागपूर : राज्यात आरोप प्रत्यारोपांचं, टीका-टिप्पणीचं राजकारण पाहायला मिळत आहे. सोबतच टोले आणि टोमणे देखील पाहायला मिळत आहेत. टोले आणि टोमण्यांच्या या वादाच्या केंद्रस्थानी आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं ट्वीट केलं होतं. तर 'महाउत्सव'च्या कार्यक्रमात गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. त्याला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुनच उत्तर दिलं. या दोघांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये साम्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


या शाब्दिक युद्धावरुन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशाप्रकारचे काही आल्यानंतर माझं मत आहे की माझा पत्नीने उत्तर देण्याचं कारण नाही. अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी यापेक्षा जास्त बोलणार नाही"


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्ध
मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत महाराष्ट्रात कोणीच 'योगी' नसून आमच्याकडे 'भोगी' आहेत असं म्हटलंं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. "ऐ 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से !" असं ट्वीट त्यांनी केलं होतं. यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र महाउत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'आजपर्यंत मला वाटत होतं की एकाच व्यक्तीला गाता येतं,' असं म्हणत अमृता फडणवीस यांचं नाव न घेता टोमणा मारता होता. त्यानंतर अमृता फडणवी यांनी देखील उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांचे मेहुण्यांवर ईडीने केलेल्या कारवाईचा आधार घेत अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, "मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे ! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात!"  


संबंधित बातम्या




इतर महत्त्वाच्या बातम्या


बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होतो: देवेंद्र फडणवीस


बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निशाणा