Nagpur News : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीसोबत तरुण 'लिव्ह इन'मध्ये (live-in relationship) राहत होता. त्यांना एक अपत्यही झाले. काही वर्षे सोबत राहिल्यावर दुसरीवर प्रेम जडल्याने तरुणाने मैत्रिणीसोबत लग्न (marriage with another girl) करण्याचे ठरवले. मात्र, इथे ट्विस्ट आला. वेळीच समुपदेशन केंद्राच्या मदतीने दुसऱ्या तरुणीची समजूत घालण्यात आल्याने तिने माघार घेतली. यातून दोघांचाही संसार वाचला.
सध्याच्या फास्ट युगात तरुणांसाठी प्रेमाची परिभाषा बदलली. तसेच प्रेमाचे प्रकारही बदलले आहे. नव्या प्रेमाची संकल्पना म्हणून सध्या खूपच प्रचलित झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीमध्ये याची क्रेझ जरा जास्तच आहे. त्यातून आजकाल 'लिव्ह इन' मध्ये राहण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, अनेकदा प्रेमात 'ट्विस्ट' (twist in love story) निर्माण होताना दिसून येतो.
अन् दोघांच्या लिव्ह इनमध्ये 'ट्विस्ट'
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार घडला. 28 वर्षीय तरुणीचे 27 वर्षीय तरुणावर प्रेम जडले. त्यातून दोघांनीही 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल पाच वर्षे एकमेकांसोबत राहिल्यावर त्यांना एक अपत्यही झाले. मात्र, याचदरम्यान तरुणाने दुसऱ्याच मुलीवर प्रेम जडले. यातून त्यांच्या आणाभाकाही सुरु (she got to know about marriage plan of a boy) झाल्या. ही बाब 28 वर्षीय तरुणीला माहिती पडली. तिने त्याला अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची नजर चुकवून तो तिच्याशी भेटायचा. दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले. दरम्यान, ही बाब कोतवाली पोलिसांकडे येताच, त्यांनी प्रकरण महाल येथील शालिनीताई बहुद्देशीय शिक्षण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिला व बालविकास केंद्राद्वारे झोन (Counseling Center) सहामधील महापालिकेच्या समुपदेशन केंद्राकडे पाठवले.
तिसरीने नकार दिल्याने वाचला संसार
समुपदेशन केंद्रातील मंगला महाजन, दीप्ती मेंढेकर व सारिका चवरे यांनी दोघांचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची माहिती घेताना समोर आलेल्या तथ्यातून त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, दोघांसह तरुणाच्या प्रेयसीलाही समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. यावेळी तिचे मतपरिवर्तन करत, मुलास लग्नाला नकार देण्यास सांगण्यात आले. तिने ते केल्याने दोघांचे संसार सुरळीत करण्यास मदत झाली असल्याची माहिती समुपदेशनात सहभागी असलेल्यांनी 'एबीपी माझा'ला दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
RBI Hike Repo Rate: तुमचा EMI महागला; आरबीआयकडून रेपो दरात 50 BPS ने वाढ