Nagpur : नागपूरमधील तरुणाईचे डेस्टिनेशन असलेले फुटाळा आता जागतिक दर्जाच्या फाऊंटेनमुळेही ओळखले जाऊ लागले आहे. देशासह विदेशी पर्यटकही या फाऊंटेन शोकडे आकर्षित होत आहेत. याच परिसरात आता विदर्भातील कला- संस्कृतीची झलक दिसावी, अशी योजना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मार्गदर्शनात तयार होत आहे. या भागासाठी हे नवे आकर्षण असणार आहे. त्यासाठी विदर्भाशी संबंधित माहिती देण्याचे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले आहे.
कलावंतांच्या उत्पादनांना मिळणार स्टॉल
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फवाऱ्यांबद्दल देश-विदेशात चर्चा सुरू झाली आहे. कारंजे पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत आहे. फुटाळा फाऊंटेन परिसर अधिक आकर्षक बनविण्यासाठी तेथे तयार करण्यात आलेले स्टाल्स हे नागपूर विदर्भाच्या कला व संस्कृतीची ओळख जगभरात पोहोचवण्याचे काम करतील अशा कलावंतांनाच दिले जावे, असा प्रयत्न आहे. नागपूर व विदर्भातील हातमाग उद्योग, हस्त कलाकारांनी अत्यंत मेहनतीने बनविलेल्या आकर्षक वस्तू, याशिवाय अन्य कला व संस्कृतीचे ओळख जगभरात पोहोचविणाचे काम करणारे लोक आणि संस्थांची त्यासाठी माहिती एकत्र केली जात आहे.
मेट्रो मुख्यालयात देता येईल माहिती
कलावंत आणि संस्थांची निवड करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने निवड केलेल्या संस्था आणि व्यक्तींना फुटाळा फाऊंटेन परिसरात स्थान दिले जाईल. अशा संस्था आणि व्यक्तींनी आपल्या उत्पादनांची पूर्ण माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या विरुध्द बाजूला असलेल्या ज्युपिटर शाळेजवळील जनसंपर्क कार्यालय किंवा महामेट्रोच्या मुख्यालयात जमा करु शकतात.
सध्या तयार असलेल्या फ्रांन्स क्रिस्टल समूहाचे 94 फाऊंन्टन
- आवाज, पाणी आणि कारंजे आदींचे सिंन्क्रोनायझेशनचे काम पूर्ण झाले आहे.
- संगीत कारंजाचा आनंद घेण्यासाठी 4 हजार जणांच्या बसण्याची सोय
- 35 मिनिटात चार टप्प्यात सादरीकर, फ्रांन्सच्या क्रिस्टल समुहाने 94 फाऊंन्टेन लावले
- फाऊंन्टेनची लांबी 180 मीटर आहे. हे सर्वात लांब फाऊंन्टेनचा दावा. 50 मीटर उंचीपर्यंत उडणारे कारंजे
असा आहे फुटाळा प्रकल्प
- 12 माळ्याची इमारत, 1100वाहन पाकिंग व्यवस्था
- इमारतीत फुडपार्क, मॉल, 11 व्या माळ्यावर मल्टीफ्लेक्स
- 12व्या माळ्यावर फिरते रेस्टॉरेंट
- 2 मेगावॅट वीजेची खपत
- बॉटनीकल उद्यानाचा किनाऱ्यावर चौपाटीचा प्रस्ताव
इतर महत्त्वाच्या बातम्या