नागपूरः नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर गुरुवारी घडलेल्या तरुण-तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात हिंगणा पोलिसांना (Hingna Police) यश आले असून या प्रेमी युगलाने (Couple) आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक जितेंद्र कांशीराम नेवारे (वय 32, रा बाबा फरीद नगर, मानकापूर, नागपूर) तर तरुणी स्वाती पप्पू बोपचे (वय 18, रा. तुमखेडा, जिल्हा: गोंदिया) हे दोघेही नात्यातच आहेत. 


जितेंद्र हा विवाहित असून वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्याने तो आईसोबत एकटाच राहत होता. मृतक स्वाती ही नात्याने त्याची पुतणी लागत होती. त्यामुळे ती कधी कधी पाहुणी म्हणून त्याच्या घरी येऊन राहत होती. त्यातून दोघांमध्ये प्रेम जळले. परंतु आपल्या नात्याला पारिवारिक व सामाजिक मान्यता मिळणार नाही म्हणून त्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.


दोघांचेही मोबाईल 'नॉट रिचेबल'


या दोघांमध्ये प्रेम होते. स्वातीला भेटायला काही दिवसांपूर्वी जितेंद्र गोंदिया ला गेला होता. 30 ऑगस्ट ला तो नागपूरला परत आला. तर त्याच्या पाठोपाठ 31 ऑगस्ट( बुधवारी) स्वाती सुद्धा नागपूरला आली. एक दिवस ते दोघेही सोबतच होते. गुरुवारी, 1 सप्टेंबर रोजी सकाळी अचानक दोघेही घराबाहेर पडले. त्यानंतर सकाळी 8 वाजतानंतर त्यांचे मोबाईल 'नॉट रीचेबल' (Not Reachable) झाले. जितेंद्रच्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून तिने हरवल्याची तक्रार सुद्धा पोलिसात दिली नव्हती. 


'सायबर एक्स्पर्ट'ची मिळाली मदत


हिंगणा पोलिसांना घटनास्थळी मयताच्या मोबाईल पैकी जितेंद्रच्या मोबाईलचा मदर बोर्ड (Mobile Mother Board) सापडला होता. यावरून सूत्र हलवीत तांत्रिक व सायबर विभागाच्या मदतीने आधी तो मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्या मोबाईलच्या आधारे मानकापूर (Mankapur) भागात ठाणेदार विशाल काळे यांनी स्वतः काही कर्मचाऱ्यांना घेऊन जितेंद्रच्या घराचा शोध लावला. जितेंद्रची आई लक्ष्मी नेवारे हिला सोबत घेऊन मयताच्या ओळख करून घेतल्या. मुलगी ही स्वाती असल्याचे सांगताच गोंदिया येथे तिच्या आईवडिलांना कळविण्यात आले. गोंदिया (Gondia) वरून तिचे आईवडील शनिवारी पोहचणार अशी माहिती ठाणेदार काळे यांनी दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur Ganeshotsav : गणेश मंडपांमधून दोन दिवसांत दीड हजारावर लसीकरण, शहरात आतापर्यंत 3.5 लाख नागरिकांनी घेतला बुस्टर डोस


Nagpur News : नव्या 42 चेक पोस्टद्वारे अवैध रेती वाहतुकीवर 'वॉच', महसूल बुडविणाऱ्यांवर कठोर कारवाई