Nagpur News नागपूर : भारतीय संघात पदार्पणातच अर्धशतकी पाळी खेळून सर्वांची वाहवाह मिळणाऱ्या टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूने निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात (Cricket) एकच खळबळ उडाली आहे. विदर्भाचं प्रतिधिनित्व करणारा आणि टीम इंडियासाठी एकमेव सामना खेळलेल्या फैज फजलने (Faiz Fazal) क्रिकेट विश्वाला रामराम केलं आहे. हरियाणाविरुद्ध खेळला जाणारा रणजी सामना हा फैजच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. फैझने 18 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या निर्णयाबाबत ही माहिती दिली आहे. फैझ याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 


पहिलाच सामना ठरला अखेरचा


विदर्भ क्रिकेटचा सलामीवीर आणि आपल्या दर्जेदार खेळीने साऱ्यांची मने जिंकणाऱ्या फैज फजलने वयाच्या 38 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फैज फजलने रणजी क्रिकेटमध्ये 7693 धावा केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाने 2017-18 आणि 2018-19 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली.  टीम इंडियाने राजकोटमध्ये इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 434 धावांनी मात करत सर्वात मोठा विजय मिळवला. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना अतिशय आनंद झाला. मात्र हा आनंदोत्सव फैज फजलच्या निर्णयाने मावळला. 18 फेब्रुवारीला विदर्भासाठी शेवटच्या वेळी फलंदाजी करुन बाहेर पडताना विदर्भ आणि हरियाणा या दोन संघांनी मिळून फैजला नागपूरच्या व्हीसीए सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर  गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले. 


इंस्टाग्रामवर पोस्ट करत केली निवृत्ती जाहीर


फैझने 18 फेब्रुवारी रोजी इंस्टावर एक पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी तो म्हणाला की, “उद्या एका युगाचा अंत होणार आहे. कारण मी उद्या नागपूरच्या मदैानात शेवटचा क्रिकेट सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. मी 21 वर्षांपूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. इथवरचा प्रवास हा अविस्मरणीय असा होता. विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे.  या आठवणी माझ्या मनात कायम राहतील. सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, फिजीओ, ट्रेनर आणि ग्राउंड स्टाफ या सर्वांचा मी आभारी आहे”, अशा शब्दात आपल्या 21 वर्षांच्या प्रवासाला उजाळा देत फैजने सर्वांना धन्यवाद दिले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या