Pohewala In Nagpur : नागपुरातील तर्री पोहे सर्वांनाच माहित असतील. झणझणीत गरमागरम तर्रीसोबत नागपुरी पोहे सगळ्यांनीच खाल्ले असतील किंवा त्या संदर्भात ऐकले तर नक्कीच असेल. आता दोन नागपूरकर अभियंत्यांनी हेच तर्री पोहे एका ब्रँडच्या स्वरूपात देशभर विस्तारण्याची तयारी सुरू केली आहे.. अभियांत्रिकी क्षेत्रातील एका स्टार्टअप प्रोजेक्टला फंडिंगसाठी सुरू केलेला दोघांचा पोह्याचा व्यवसाय आता चांगलाच भरभराटीस आला आहे. दोघे दरवर्षी थोडे थोडके नाही तर तब्बल 13 लाख प्लेट पोहे विकत आहेत.
नागपुरी तर्री पोहे, कांदा पोहे, सावजी पोहे, पनीर पोहे, इंदोरी पोहे, मिसळ पोहे, चिवडा पोहे, ऑरगॅनिक पोहे.... या आणि पोह्याचे असे अनेक प्रकार पोहेवाला डॉटकॉम च्या आउटलेट वर तुम्हाला चाखायला मिळतील... 2018 मध्ये एका छोट्याशा दुकानातून छोट्याशा कढईतून सुरू झालेला पोह्याचा हा व्यवसाय आता भरभराटीस आला असून पोहेवाला डॉटकॉमच्या (व्यवसायाचा नाव) नागपूरसह देशातील अनेक शहरात आऊटलेट्स आहेत... मात्र, या व्यवसायाच्या मागे कोणी हॉटेल व्यवसायिक नाही, तर सिव्हिल इंजिनियर असलेला चाहूल बालपांडे आणि मेकॅनिकल इंजिनियर असलेला पवन वाडीभस्मे हे दोघे तरुण आहेत.. दोघांनी पोह्याचा व्यवसायाचे सुरू केला नाही... तर त्या संदर्भात काही संशोधनही केले आणि स्वतःचे खास मसाले तयार करत खास नागपुरी तरी पोह्याची झणझणीत चव कायम ठेवतानाच त्यातील मसाले शरीराला अपायकारक ठरणार नाहीत, अशा पद्धतीच्या रेसिपीज तयार केल्या... त्यामुळे आज त्यांच्या पोह्याच्या सर्व सातही आउटलेट्सवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते...
दोन्ही अभियंतांनी पोह्याचा व्यवसाय सुरू करताना एक वेगळीच शक्कल लढवली होती... नागपुरात दिवसा जसा पोह्याचा व्यवसाय चालतो... तेव्हाच प्रमाणात रात्री पोहे खाणारी तरुणाई मोठ्या संख्येने आहे हे ओळखून दोघांनी रात्री उशिरापर्यंत पोहे विकण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आणि नागपूरकर तरुणांनी ही त्यांच्या रात्री उशिरा गरमागरम पोहे विकण्याच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद दिला...
नागपुरात दहा बाय दहाच्या छोट्याश्या दुकानातून सुरू झालेला पोहेवाला डॉटकॉम चा व्यवसाय आज नागपूर बाहेर इतर अनेक शहरांपर्यंत पोहोचला आहे... लवकरच दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरातही पोह्याचे आउटलेट्स उघडले जाणार आहे... मात्र, दोन्ही अभियंत्यांनी उच्च शिक्षित असताना ही पोह्याचे व्यवसाय का सुरू केले याची कहाणी ही रंजक आहे... अभियंता झाल्यानंतर चाहूल बालपांडे आणि पवन वादिभस्मे समोर पुढे काय करायचे असा प्रश्न होता.. दोघांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मोठा स्टार्ट अप सुरू करण्याचे ठरविले.. मात्र, त्यासाठी लागणारा सुरुवातीचा भांडवल त्यांच्याकडे नव्हता... त्यामुळे दोघांनी निधीची उभारणी करण्यासाठी पोह्याचा व्यवसाय सुरू केला... मात्र, त्यांच्या या व्यवसायाला एवढा जोरदार प्रतिसाद मिळाला की दोघांनी आता पोह्याचा व्यवसायावर लक्ष केंद्रित करत त्यास देशपातळीवर वर पोहोचवण्याचे ठरविले आहे...
पोहेवाला डॉटकॉमच्या दुकानात फक्त वेगवेगळ्या चवीचे पोहेच मिळत नाहीत.. तर आता त्या ठिकाणी ऑरगॅनिक पोह्यांची विक्री ही सुरू करण्यात आली आहे.. पारंपरिक पांढऱ्या पोह्यात ब्लिचिंग पावडर मिसळला जातो.. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो... माता, छत्तीसगड मधील ब्राऊन पोहे पूर्णपणे सेंद्रिय पोहे असून त्यावर आधारित नवनवीन रेसिपी सध्या दोन्ही अभियंत्यांनी सुरू केली आहे..