नागपूर: राज्य सरकारने जुने वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर (Smart Meter) लावण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. मात्र, स्मार्ट मीटर कोणत्या ग्राहकांसाठी राहतील?, सरसकट सर्वांनाच ते देणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्राहकांमध्येही हे मीटर हिताचे की तोट्याचे, अशी चर्चा सुरू झाली आहे. शंका -कुशंकांसह (Doubt) चर्चा सुरू आहेत. महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. यामुळे संभ्रंमात चांगलीच भर पडली आहे.


राज्यात सत्तांतरण होताच ऊर्जा विभागाशी (Energy Department) संबंधित 39,602 कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला सरकारने मंजुरी दिली. या योजनेअंतर्गतच महावितरणतर्फे 1 कोटी 66 लाख ग्राहकांकडे 'स्मार्ट वीजमीटर' बसविण्यात येणार आहेत. सोबतच 4.7 लाख वितरण रोहित्र आणि 27,826 वीजवाहिन्यांवरही स्मार्ट मीटर लावले जाणार आहे. वितरण हानी अधिक असलेल्या भागात प्राधान्याने हे मिटर लागतील. त्यानंतर टप्प्या टप्प्याने संख्या वाढविली जाईल. येवढीच माहिती महावितरण अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. पण, घरी असणारे जुने मीटर चांगल्या स्थितीत असतानाही ते बदलून स्मार्ट मीटर देणार का? हा खरा प्रश्न आहे. मीटरसाठी खर्च कुणाला (Expenses for New meter) करावा लागणार हा प्रश्नसुद्धा अनुत्तरितच आहे. 


बील न भरणारे लक्ष्य


महाविरणची थकबाकी (Pending Bills) सातत्याने वाढते आहे. त्यावर उपाय म्हणूनच स्मार्ट मीटरचा उतारा शोधला गेला आहे. बील न भरणाऱ्या ग्राहकांकडे प्राधान्यक्रमाने स्मार्ट मीटर (Smart Meter) लावले जातील. त्यांना जमा केलेल्या पैशां ऐवढाच वीजवापर करता येऊ शकेल, यामुळे वाढती थकबाकी नियंत्रणात येऊ शकेल. स्मार्ट मीटरची चर्चा आताच सुरू असली तरी स्मार्ट मीटर ग्राहकांच्या सेवेत येण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंत वाट बघावी लागू शकते, असे महावितरणमधील अंतर्गत सूत्रांचा दावा आहे. 


नागपूर जिल्ह्यातील ग्राहकसंख्या



  • 11 लाख घरगुती ग्राहक

  • 1 लाख वाणिज्यक ग्राहक

  • 20 हजार औद्योगिक ग्राहक 


स्मार्ट मीटरचे फायदे



  •  मोबाईल सारखे स्मार्ट मीटर रिचार्ज करता येईल

  •  मीटर पोस्टपेड आणि प्रिपेड स्वरूपात उपलब्ध राहील

  •  महावितरणला मीटर रिडिंगसाठी कर्मचारी पाठविण्याची गरज उरणार नाही

  •  ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल

  •  वीज वापरानुसारच बिल येईल, वीजचोरीस आळा बसेल

  •  प्री पेडमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल

  •  वीज बिलातील त्रुटी दूर होऊन तक्रारी कमी होतील

  •  मीटरमध्ये फेरफार झाल्यास त्याची सूचना मुख्यालयाला लगेच मिळेल


स्मर्ट मीटरसंदर्भातील कुशंका



  •  स्मार्ट मीटर महागडे असतील.

  • मीटरभाडे कसे आकारणार

  • इंधन अधिभार लावायचा झाल्यास प्रिपेड ग्राहकांकडून कसा आकारणार.

  •  प्रामुध्याने उन्हाळ्यात इंधन अधिभार गृहित धरून अधिक दराने बील आकारणीची शक्यता

  • मिटरमध्ये फॉल्ट असल्यास पैसे गतीने संपण्याची शक्यता.

  •  मध्यरात्री अचानक रिचार्ज संपल्यास उकाड्यात ग्राहकांना त्रास

  •  रिचार्ज संपन्याबाबत ग्राहकांमध्ये धास्ती


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur Metro : नागपूर मेट्रोला जिओ स्पॅशियल वर्ल्ड तर्फे 'एक्सलंस मेट्रो प्रकल्प अवॉर्ड'


Nagpur ZP News : प्रशासकीय दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका, अनेक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन बंद !