नागपूर: जिओ स्पॅशियल वर्ल्ड - मीडिया क्षेत्रातील एका नामांकित संस्थेतर्फे नागपूर मेट्रो प्रकल्पाला (Nagpur Metro) `एक्सलंस मेट्रो प्रकल्प अवॉर्ड' मिळाला (Excellence Metro Award) आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नागरी उड्डयन राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या एयरोसिटी येथील हॉलिडे इन हॉटेल येथे काल झालेल्या एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
जीयो स्मार्ट इंफ्रास्ट्रक्चर 2022 च्या (Jio Smart Infrastructure 2022) निर्णायक मंडळाने घेतलेल्या निर्णयात महा मेट्रोला सर्व संमतीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाचे अतिरिक सचिव अमित घोष या निर्णायक मंडळाच्या अध्यक्षपदी होते. हा प्रतिष्ठित पुरस्कार जीयो स्मार्ट इंफ्रास्ट्रक्चर पुरस्काराचा भाग असून पायाभूत सुविधांचा विकास, मालमत्ता सर्वेक्षण, वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणाऱ्या संस्थेला दिला जातो. या क्षेत्रात अमोल काम करणाऱ्या संस्था, प्रकल्प किंवा व्यक्तींचा सत्कार करत त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
5D BIM हि डिजिटल प्रकल्प
वाहतूक कोंडी (Traffic congestion) आणि रस्ते अपघात (Road Accident) सारख्या महत्वाच्या विषयांवर तसेच सर्व सामान्य नागरिकांना एक सहज सोपे प्रवासाचे साधन मिळवून दिल्या बद्दल देखील नागपूर मेट्रो प्रकल्पाची दाखल निर्णायक मंडळाने घेतली. 5D BIM प्रणाली लागू करणारी महा मेट्रो देशातील पहिली संस्था आहे. 5D BIM हि डिजिटल प्रकल्प व्यवस्थापना संबंधीची आधुनिक संकल्पना आहे. या अंतर्गत कामाचे अतिशय उपयुक्त पद्धतीने व्यवस्थापन करता येते. 5D BIM संकल्पनेच्या मदतीने महा मेट्रोला प्रकल्पाला लागणारा वेळ आणि त्यावर होणार खर्च यावर नियंत्रण ठेवता आले. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते `एका पिलरवर सर्वात मोठे डबल डेकर व्हाया डक्ट (Largest double decker via duct on one pillar) आणि उड्डाण पूल' (Flight bridge) तसेच `डबल डेकर व्हाया डक्टवर सर्वात जास्त मेट्रो स्टेशनची निर्मिती केली' म्हणून आशिया (Asia) आणि इंडिया बुक (India Book) वर रेकॉर्ड्स तर्फे प्रशस्ती पत्र मिळाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या