नागपूर : पर्युषण पर्व दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार श्रावण वैद्य 12 व भाद्रपद शुध्द 4 या दिवशी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाने निर्णय घेतलेल्या आहे. तसेच उर्वरीत दिवशी (श्रावण वैद्य 13 ते भाद्रपद शुध्द 3 व 5) सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार  बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी (श्रावण वैद्य 12) आणि बुधवार दिनांक 31 ऑगस्ट (भाद्रपद शुध्द 4) रोजी नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल. तसेच दिनांक 25 ऑगस्ट (श्रावण वैद्य 13) ते 30 ऑगस्ट दरम्यान व 01 सप्टेंबर (भाद्रपद शुध्द 3 व 5) या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.


Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 1183 कोरोना रुग्णांची नोंद तर 1098 रुग्ण कोरोनामुक्त


पर्युषण पर्व म्हणजे?


श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व हा 8 दिवसांचा असतो. तर दिगंबर जैन बांधवांचा सण हा 10 दिवसांचा असतो. श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व संपल्यावर दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व सुरु होतो. या वर्षी 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व आहे. जैन बांधव या पर्युषण पर्व सणाच्या च काळात मनातील सर्व क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व गोष्टींवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडत असल्याची मान्यता आहे. मनात येणारे तामसिक विचार दूर करण्याचा उपवास म्हणजेच पर्युषण असे म्हणतात. पर्युषणचा सामान्य अर्थ आहे की, या उत्सवात आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचारांपासून सुटका. जैन बांधवांचा पर्युषण पर्व हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या 10 नियमांचे पालन करुन पर्युषण पर्व साजरा करतात. हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो.


Nitin Gadkari : अटलजी-अडवाणींसारख्या नेत्यांमुळं आज मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता : नितीन गडकरी